logo

मुघलांनी पांढरा किल्ला बांधला होता; मग त्याला लाल रंग कोणी दिला? काय आहे त्याचा इतिहास...,.?

यंदा आपण 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. 15 ऑगस्ट 1947 साली ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पहिल्यांदा ध्वजारोहण करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येतो. पण तुम्हाला लाल किल्ल्याचा इतिहास आणि त्याचा रंगाबद्दल माहिती आहे का?

कोणी बांधला लाल किल्ला?

भारताची शान असलेला लाल किल्ला 1638 मध्ये बादशहा शहाजहान यांनी बांधला त्यानंतर मुघलांनी त्यांची राजधानी आग्राहून दिल्लीला हलवला. या किल्ल्याची खासियत म्हणजे हा किल्ल्याची तिन्ही बाजू यमुना नदीने वेढलेला आहे. या किल्ल्याच्या बांधकामासाठी लाल वाळूच्या दगड्यासह पांढरे संगमरवरही दगडांचा वापरण्यात आला होता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, त्यावेळी या किल्ल्याला मौल्यवान हिरे आणि सोन्या-चांदीने सजवण्यात आले होते. पण जेव्हा हा किल्ल्यावर इंग्रजांनी ताबा घेतला त्यावेळी त्यावरील मौल्यवान हिरे आणि धातू काढून टाकले. तसंच ही ऐतिहासिक वास्तू 30 मीटर उंच दगडी भिंतीने वेढलेली आहे. 
त्या काळात हा किल्ला बांधण्यासाठी सुमारे 1 कोट एवढी रक्कम लागली होती. त्या काळातील हा किल्ला सगळ्यात महागडा किल्ला होता. लाल किल्ल्याला दोन प्रवेशद्वार असून एक लाहोर गेट आणि दुसरा दिल्ली गेट. लाहोर गेट सामान्य पर्यटकांसाठी तर दिल्ली गेट सरकारसाठी आहे.

लाल रंग कोणी दिला?

लाल किल्ला हा 255 एकरमध्ये पसरलेला आहे. अनेक इतिहासकारांचा असा दावा आहे की, हा किल्लानंतर किंवा ब्रिटिशांनी जतन करण्याच्या उद्देशाने लाल रंगवला असावा. इतिहासकारांचा असाही विश्वास आहे की, किल्ल्याची तटबंदी फक्त लाल वाळूच्या दगडापासून बनवलेली आहे. म्हणून त्याला लाल मानले जाते. आजही लाल किल्ल्याचे बरेच भाग पांढऱ्या दगडांनी बनवलेले दिसतात. अशा परिस्थितीत असे म्हणता येईल की तो कधीही पूर्णपणे लाल झाला नाही

60
5232 views