logo

खापर येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा;पारंपरिक वेशभूषेतील शोभायात्रेत हजारोंचा सहभाग

खापर येथे जागतिक आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा;पारंपरिक वेशभूषेतील शोभायात्रेत हजारोंचा सहभाग
अक्कलकुवा प्रतिनिधी (गंगाराम वसावे)
जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त खापर गावात उत्साहाचे वातावरण होते.याहामोगी ग्रुप खापर, समस्त आदिवासी समाज आणि खापर गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
परिसरातील शेकडो आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून या शोभायात्रेत सहभाग घेतला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्य आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ही शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गांनी फिरून कार्यक्रमाच्या सांगता ठिकाणी पोहोचली.या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी शिवाजी पाडवी, गणेश वसावे, सुनील वसावे, रवी पाडवी, रामा पटेल, गुलाबसींग पाडवी, अजबसिंग महाराज, राजाराम पाडवी, लक्ष्मण वाडीले, ललित जाट आणि भूषण कोचर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे महत्त्व सांगितले आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद पाडवी, चेतन पाडवी, अविनाश पाडवी, हरीष पाडवी यांच्यासह याहामोगी ग्रुप खापर, समस्त आदिवासी समाज आणि गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

84
4850 views