
लागू नसलेली जी. एस. टी. उकळणाऱ्या साई इलेक्ट्रिकल्स चे मुखत्यार धारक आनंद चंद्रकांत मुनोत यांच्या वर कायदेशीर कारवाई करा : विकास खेडकर
ऑल इंडिया क्राईम रिपोर्टर जालिंदर आल्हाट सह मुख्य संपादक नानासाहेब उंडे
- अहिल्या नगर येथील मे. साई इलेक्ट्रिकल्सचे मुखत्यार धारक आनंद चंद्रकांत मुनोत रा. साई व्हिला, हॉटेल यश ग्रँड समोर स्टेशन रोड यांनी सुपा औद्योगिक वसाहतीतील प्लॉट हस्तांतरनाच्या व्यवहारात लागू नसलेली जी एस टी ची रक्कम घेऊन माझी व शासनाची घोर फसवणूक केली असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येऊन माझे सर्व पैसे व्याजासहीत परत मिळावेत अशी मागणी नव उद्योजक विकास खेडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, सुपा औद्योगिक क्षेत्रातील E-10 हा 30 गुंठ्याचा प्लॉट मे. व्ही. के. ई. सी. पॉवर केबल प्रा. लि. या कंपनीसाठी विकास खेडकर यांनी २३ जुलै २०२४ रोजी ९० लाख रुपये देऊन भूखंड हस्तांतरन लीज डीड असाइनमेंट केली. या वेळी त्यांना जी एस टी पोटी १८ टक्के रक्कम म्हणजे १६ लाख २० हजार रुपये ऑनलाईन भरायला भाग पाडण्यात आले. त्यानंतर तांत्रिक कारणे सांगून आनंद चंद्रकांत मुनोत यांनी रक्कम सरकारी खजिन्यात भरल्या बाबतची पावती देण्याबाबत टाळाटाळ केली.
अधिक चौकशी केली असता असे समजले की, भूमी हस्तानतरन लीज डीड असाइनमेंट साठी जी एस टी रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. आनंद चंद्रकांत मुनोत यांना या व्यवहारासाठी जी एस टी लागू होत नाही, हे माहिती असूनही विकास खेडकर यांच्याकडून ती वसूल करून घेतली.
आनंद चंद्रकांत मुनोत यांनी माझ्या बरोबरच शासनाची ही फसवणूक केल्या ची भावना खेडकर यांनी व्यक्त केली.
या सर्व व्यवहारात त्यांच्याबरोबर त्यांची आई श्रीमती. सरला चंद्रकांत मुनोत व आशिष चंद्रकांत मुनोत हेही तेव्हडेच जबाबदार आहेत.
नव उद्योजकांची जी एस टी च्या नावाखाली फसवणूक करणारा हा प्रकार सुपा येथील एमआयडीसी घडला आहे.
औद्योगिक भूखंडाचे मालक व एजंट/दलाल औद्योगिक भूखंडाचे विक्री पोटी GST देय असल्याची बतावणी करून खरेदीदारा कडून GST पोटी अव्वाच्या सव्वा रक्कम उकळवत असल्याचे जाणवते.
माझी ज्या पद्धतीने फसवणूक झाली तशी फसवणूक या पुढे कोणाची ही होऊ नये या साठी सर्वांनीच जागृत राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विकास खेडकर यांनी या वेळी केले.