logo

मुरुड येथील आ रमेश आप्पा कराड यांच्या जनता दरबारला अभुतपुर्व प्रतिसाद

प्रतिनिधी :- विकास वाघ
प्रलंबित समस्यांचा जनता दरबारात नागरिकांनी वाचला पाढा
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, व्यथा आणि अडीअडचणी समजून घेता याव्या त्यांच्याशी संवाद करता यावा यासाठी लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड साहेब यांनी लातूर तालुक्यातील
मौजे मुरुड येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबार मध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या समस्यांचा नागरिकांनी पाढाच वाचला. या सर्व प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन जे शक्य आहेत ते प्रश्न जागेवरच त्यांनी सोडविले. इतर प्रश्न संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे देऊन तात्काळ कारवाई करून निकाली काढण्याच्या सूचना आमदार महोदयांनी दिल्या. तब्बल साडेपाच ते सहा तास सुरू असलेल्या या जनता दरबारास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
लातूर तालुक्यातील मौजे_निवळी, चिंचोली (बल्लाळनाथ), काटगाव, एकुर्गा, गादवड या जिल्हा परिषद मतदार संघासह मुरुड शहर या कार्यक्षेत्राचा जनता दरबार दि २५ जुलै शुक्रवार रोजी मुरुड येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात लातूर #ग्रामीणचे_आमदार_श्री_रमेश_आप्पा #कराड_साहेब यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत, भाजपाचे विक्रमकाका शिंदे, प्रदीप पाटील खंडापूरकर, भागवत सोट,मुरुडच्या सरपंच श्रीमती अमृताताई नाडे, उपसरपंच हनुमंतबापू नागटिळक, मंडल अध्यक्ष सुरज शिंदे, प्रताप पाटील, मुरुड शहराध्यक्ष वैभव सापसोड आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होती. यावेळी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या दहा पंधरा वर्षात गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना #आमदार_साहेबांना भेटता आले नाही, आपले प्रश्न अडीअडचणी त्यांच्याकडे मांडता आल्या नाहीत. लातूर ग्रामीण मतदार संघातून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार रमेश आप्पा कराड साहेब यांनी ज्यांचा कोणी वाली नाही त्याला न्याय देण्याची भूमिका घेऊन, जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न समजून घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी मुरुड येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेल्या या जनता दरबारमध्ये उपस्थित ग्रामीण भागातील नागरिकांनी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या समस्या, गऱ्हाणे मुक्तपणे मांडून निवेदनाचा पाऊसच पडला.
मुरुड_शहरासह ग्रामीण भागातील विविध गावातील नागरिकांनी शेतस्ते, घरकुल, समशानभूमी, अतिक्रमणे, शेतीतील वीज प्रश्न, कबाले, समाज मंदिर, निराधार च्या पगारी, राशन दुकानचे प्रश्न, आरोग्य विषयक तक्रारी, विविध गावातील अवैधधंदे, याबरोबरच मुरुड येथील रेल्वे स्थानक विकसित करावे, पुणे आणि मुंबई रेल्वेला थांबा द्यावा, एमआयडीसी सुरू करावी, अवजड वाहने मुरुड शहराच्या बाहेरून जावीत आदी मागण्यांचे निवेदन देऊन अनेकांनी जनता दरबार घेतल्याबद्दल #आ_रमेश_आप्पा_कराड_साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले.
बोगस कामाची चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात येईल रस्त्यावरील अतिक्रमणे तात्काळ काढून मोकळे करावेत जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा महत्त्वपूर्ण सूचना करून आ रमेशआप्पा कराड यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, मराठा आरक्षणाला यापूर्वीच मी जाहीर पाठिंबा दिला असून राज्याचे #मुख्यमंत्री_देवेंद्रजी_फडणवीस_साहेब यांनीच यापूर्वी आरक्षण दिले होते निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारने घालविलेले मराठा आरक्षण पुन्हा #देवेंद्रजीच देऊ शकतात याची सर्वांना खात्री झाली आहे असेही त्यांनी बोलून दाखविले.
साडेपाच ते सहा तासांच्या जनता दरबारात प्रत्येक नागरिकाशी #आ_रमेश_आप्पा_कराड_साहेब यांनी संवाद साधून प्रश्न समजून घेते जे शक्य आहे त्या प्रश्नांचा तडकाफडकीने निर्णय केले तर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या सूचना केल्या. नागरिकांच्या सर्वच निवेदनावर महिनाभरात कार्यवाही झालेली दिसेल अडचणीच्या विषयात निश्चितपणे योग्य तो मार्ग काढला जाईल प्रशासन गतिमान करण्यासाठी अधिकाऱ्याबरोबरच नागरिकांनीही सहकार्य करावे केवळ तक्रारी देऊन न थांबता त्याचा पाठपुरावा असे सांगून यावेळी बोलताना #आ_रमेश_आप्पा_कराड_साहेब यांनी लातूर ग्रामीण मतदार संघात चारही ठिकाणी दर तीन महिन्याला जनता दरबार घेऊन जनतेचा न्याय देण्याची काम केले जाईल असे बोलून दाखवले.
प्रारंभी आ_रमेश_आप्पा_कराड_साहेब यांचा यथोचित सत्कार करून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले. या जनता दरबार कार्यक्रमास भाजपाचे नवनाथ भोसले, सतीश आंबेकर, अनिल भिसे, साहेबराव मुळे, बंसी भिसे, उद्धव काळे, श्याम वाघमारे, पद्माकर चिंचोलकर, महेश कणसे, शीतल पाटील, भैरवनाथ पिसाळ, राजकिरण साठे, लता भोसले, गोपाळ पाटील, अशोक सावंत, बाबासाहेब भिसे, काशिनाथ ढगे, धनंजय देशमुख, शुभम खोसे, विशाल कणसे, वैभव मगर, बालासाहेब कदम, सचिन सवई, प्रशांत शिंदे सुरज सूर्यवंशी, रवी माकोडे, युवराज सव्वाशे, कल्याण पठाडे, वैजनाथ हराळे, उषा शिंदे, श्रुती सवयी या प्रमुख कार्यकर्त्यांसह लातूर तहसीलचे विविध विभागाचे नायब तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी पी जी राठोड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आर एम शेंडेकर, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता एबी साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी एम के तांबोळी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे एस जी शेळके, जि प बांधकाम उपविभागाचे एस जी कुलकर्णी, पाणीपुरवठा उपविभागाचे अभियंता डी डी मुळे, भूमि अभिलेखचे एस व्ही भोसले, पशुधन विकास अधिकारी जे पी वाघमारे, मुरुडचे पोलीस निरीक्षक अशोक उजगरे, तालुका आरोग्य अधिकारी आर एच पवार, गटशिक्षणाधिकारी सी आर शेख, आरटीओ अंजली पाथरे, वन परिमंडळ अधिकारी एच एस बिराजदार, यांच्यासह जिल्हा रेशीम उद्योग, महावितरणचे अभियंता, घरकुल आणि नरेगा विभागाचे अधिकारी, विस्तार अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

9
1938 views