logo

आकार जिम्नॅस्टिक्स सेंटर, कल्याण मधील ३ खेळाडूंचा अखिल भारतीय ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्स स्पर्धे करीता महाराष्ट्रचा संघात निवड,

कल्याण - चिराग केने , अभिप्रीत विचारे , वर्या पाटील हे खेळाडू देहरादून येथे दिनांक ८ ते १० ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही निवड प्रशिक्षक निशांत यशवंतराव , आंतरराष्ट्रीय पदक विजेता व शिवछत्रपती अवॉर्डी प्रशिक्षक अभिजीत शिंदे , आणि आकार जिमनास्टिक्स चा खेळाडू व आंतरराष्ट्रीय पदक विजेता ओमकार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि पालकांच्या सततच्या पाठिंब्यामुळे शक्य झाली. विशेष आभार म्हणून संस्थापक सौ पुष्पा ईश्वर शिंदे यांचे — ज्यांच्या पुढाकारामुळे आज आकार जिम्नॅस्टिक्स हे आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा असलेले प्रतिष्ठित प्रशिक्षण केंद्र बनले आहे.

70
11118 views