logo

Breaking! जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा तडकाफडकी राजीनामा........

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तात्काळ प्रभावाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी प्रकृतीसंबंधी समस्या आणि वैद्यकीय सल्ल्याचा हवाला देत संविधानाच्या कलम 67 (अ) अंतर्गत राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. आपण तात्काळपणे पद सोडत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 
राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात जगदीप धनखड यांनी लिहिलं आहे की, 'आरोग्याला प्राधान्य देऊन आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करून, मी भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा तात्काळ राजीनामा देत आहे.' त्यांनी राष्ट्रपतींचे सहकार्य आणि सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल आभार मानले आहेत. तसंच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

जगदीप धनखड यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात लिहिलं आहे की, "संसदेतील सर्व सन्माननीय सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम, विश्वास आणि आदर आयुष्यभर माझ्या हृदयात राहील". उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्या कारकिर्दीची आठवण करून देताना ते म्हणाले, "या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला मिळालेल्या अनुभवांबद्दल आणि दृष्टिकोनांबद्दल मी मनापासून आभारी आहे. भारताच्या आर्थिक विकासाचे आणि अभूतपूर्व परिवर्तनाच्या टप्प्याचे साक्षीदार होणे माझ्यासाठी भाग्याची आणि समाधानाची गोष्ट आहे." भारताच्या जागतिक उदयावर आणि उज्ज्वल भविष्यावर अढळ विश्वास व्यक्त करून त्यांनी पत्राचा शेवट केला आहे. 
 

77
3301 views