logo

अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई, इराईबारीपाडा ते खाई दरम्यान पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता तयार करण्यात आलेला आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे या घाटात जागोजागी दरडी कोसळून रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही. तसेच काही ठिकाणी पुलाचे कठडे सरकले आहेत.तरी संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन मार्ग सुरळीत करण्याची मागणी नागेश पाडवी यांनी केली आहे.

अक्कलकुवा प्रतिनिधी:(गंगाराम वसावे)
अक्कलकुवा तालुका हा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुका असून अक्कलकुवा तालुक्याचा निम्म्यापेक्षा जास्त गावपाड्यांचा भाग सातपुड्याच्या द-या खोऱ्यात विखुरलेला आहे. शासन गावपाड्यांना जोडण्यासाठी व रस्ते विकासासाठी करोडो रुपयांचा निधी देत असते. मात्र प्रत्यक्षात संबंधित ठेकेदार व नियंत्रण करणारे अधिकारी व अभियंते यांच्या मिली भगत मुळे गुणवत्ता पूर्ण कामे होत नसल्याने जनतेचे हाल होत असल्याने तालुक्यामधील जनतेकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
तालुक्यातील देवगोई घाट, होराफळीचा घाट, कुवा घाट, कंकाळ घाट, दहेल घाट, कोलमीमाळ घाट असे सर्व रस्ते घाटाचे असून गेल्या दहा ते अकरा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्त्यांवर साधी दुरुस्ती देखील करण्यात आली नसल्याने भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली असून याबाबत त्वरित चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई, इराईबारीपाडा ते खाई दरम्यान पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता तयार करण्यात आलेला आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे या घाटात जागोजागी दरडी कोसळून रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही. तसेच काही ठिकाणी पुलाचे कठडे सरकले आहेत. मात्र या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाचे व प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
तरी संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन मार्ग सुरळीत करण्याची मागणी नागेश पाडवी यांनी केली आहे.

42
3382 views