logo

ढोराळा येथे ३१०० झाडांची लागवड



जिल्हा प्रतिनिधी | विकास वाघ


हरित धाराशिव या जिल्हा प्रशासनाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेंतर्गत कळंब तालुक्यात ढोराळा ग्रामपंचायतीने विविध प्रकारच्या ३१०० झाडांची लागवड केली. या मोहिमेत जिल्हा परिषद व संत गोरोबा काका विद्यालयाचे शिक्षक, १०० विद्यार्थी, सरपंच , तलाठी , अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी सहभाग नोंदवला. या वर्षी महाराष्ट्र शासनाने घनवृक्ष वृक्षारोपणाचा संकल्प केला असून याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने हरित धाराशिव मोहिमेंतर्गत शनिवारी (दि.१९) एकाच दिवशी १५ लाख झाडे लावण्याचा संकल्प केला. त्यानुसार कळंब तालुक्यातील ढोराळा ग्रामपंचायतीने १० गुंठे जमिनीची मशागत करून शनिवारी (दि १९) ३१०० विविध प्रकारच्या फळा फुलांच्या रोपांची लागवड केली. यावेळी नितीन भोसले, विष्णू नाईकनवरे, अशोक थोरात, पांडुरंग चौधरी, प्रल्हाद चौधरी ग्रामसेवक अशोक निपाणीकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय जायभाय, संत गोरोबा काका विद्यालयाचे मुख्याध्यापक खांडेकर
शिक्षक आप्पासाहेब गोरे, जालिंदर बेलगुरे,उषाताई मुंडे सुरेखा पालकर सुवर्णा घंटे, स्वाती कऱ्हाळे,क्षीरसागर, अंगणवाडी सेविका, मदतनीस कार्यकर्ती, बचत गटांच्या महिलांसह सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार वृक्षारोपणाला सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य रोजगार सेवक सि आर पी संगणक परिचालक तसेच वाठवडा शाळा प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थांना हजर राहण्याबाबत कळवले होते, त्या सर्वांनी उस्फूर्त सहभाग घेऊन मोहीम यशस्वी केली. असे सरपंच छाया विलास थोरात यांनी सांगितले.

94
3337 views