logo

आंबी-अंमळनेर ते श्रीक्षेत्र ताहाराबाद एकादशिला पायी दिंडी सोहळा


आंबी(वार्ताहर)
राहुरी तालुक्यातील आंबी अंमळनेर ते संत कवी महिपती महाराज यांच्या प्रतिपंढरी असलेल्या श्रीक्षेत्रताहराबाला वैकुंठवासी गुरुवर्य विश्वनाथबाबा पायी दिंडी सोहळा बुधवार दि. २१ जुलै कामिनी आषाढी एकादशीला जाणार आहे.
या पायी दिंडी सोहळ्याचे २८वे वर्षे असून आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी ८:०० वा. हनुमान मंदीरात गुरुवर्य विश्वनाथ बाबा यांच्या प्रतिमा व पादुकाचे पुजन होऊन टाळ, मृदंगाच्या गजरात श्री विठ्ठल नामाच्या जयघोष करत रथातून पालखी पायी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे.
या पायी दिंडी सोहळ्याचे दवणगाव (गणेशवाडी ) गुहा,तांभेरे,वडनेर येथे उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात येते. प्रारंभी श्री.कचरू साळुंके,भाऊसाहेब साळुंके (वायरमन) वसंतराव जाधव,विठ्ठल जाधव,बाळकृष्ण जाधव, दतात्रय तोडमल,सुभाष अंत्रे, सुरेशराव वाबळे पा. अण्णासाहेब बलमे आदि भाविक फराळ वाटप करत उत्स्फुर्तपणे स्वागत करतात.
श्री संत कवी महिपती महाराज पायी दिंडी सोहळ्याचे वारकरी परतीच्या वाटेला पंढरपूरच्या श्री विठूरायाला मुळ लाऊन धाकट्या आषाढीला प्रति पंढरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र ताहराबादला बरोबर घेऊन येतात त्यामुळे धाकट्या एकादशीला येथे पंढरी अवतरते तरी आंबी अंमळनेर परिसरातील गावातील अबालवृद्ध भाविकांनी या पायी दिंडीत सोहळ्यात सहभागी होऊन हरिनामाचा आनंद द्विगुणीत करावा असे अवाहन वै विश्वनाथ बाबा भजनी मंडळ व पायी दिंडी सोहळा समितीसह समस्त ग्रामस्थ आंबी-अंमळनेर ग्रामस्थयांनी केले आहे.

32
807 views