logo

महाराष्ट्र लोहार राज्यस्तरीय समविचारी समन्वय समिती होण्याबाबत पहिली बैठक अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा या ठिकाणी संपन्न.

राहुरी प्रतिनिधी शिवाजी दवणे
रविवारी दिनांक १३/७/२०२५ रोजी लोहार समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य स्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यासाठी लोहार समाज बंधू ,बांधव बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील लोहार समाज्याच्या विविध शासकीय अशासकीय विकासासाठी आता एकञीकरणा शिवाय पर्याय नाही असे उपस्थित असलेल्या व ज्येष्ठ नेत्यांच्या व तरूण युवकांच्या माध्यमातून समविचारी विषयांची देवाण-घेवाण झाली भविष्यात आपल्या समाजासाठी न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तालुके व खेड्यापाड्यातील गाव वस्तीत वास्तव्य असलेल्या आपल्या लोहार समाजाचा प्रज्वल विकास एकत्र होण्यासाठी हाच एक पर्याय आहे हीच एकत्रित करण्याची सुरुवात अशी यलगार समाजाच्या उत्कर्षासाठी अहिल्या नगर या ठिकाणी सुरुवात करण्यात आली उपस्थित विविध जिल्ह्यांतील असलेले लोहार समाज पदाधिकारी नेतेमंडळी यांनी आपल्या भाषणात सांगितले या लोहार समाज यलगार मीटिंगमध्ये उपस्थित समाज नेते मंडळी श्री राजेशजी सोमवंशी साहेब को. वि लो. समाज संघटना कार्याध्यक्ष , श्री यशवंत गायकर साहेब को.वि .लो.समाज संघटना महासचिव ,श्री संजय भाऊ कोळंबेकर को.वि.लो समाज संघटना मुंबई जिल्हा प्रमुख श्री दिलीपजी थोरात ,श्री किसनजी बनसोडे साहेब पुणे विभाग ,श्री मधुकरजी शेंडे साहेब वैदर्भीय लोहार समाज संघटनेचे पदाधिकारी ,श्री उत्तम शेंडे ,वासुदेवजी शेंडे ,नरेंद्रजी बावनकर ,दत्ताराम घुगस्कर परिवर्तन पॅनल विदर्भ ,श्री विनायक हराळ विश्वकर्मा युवा मंच धुळे अध्यक्ष, श्री ललित जी सकपाळ युवा नेते जामनेर जळगाव वैदर्भीय द्वार संघटना कार्यकर्ते श्री रामलिंग कांबळे जेष्ठ पत्रकार , खोसपुरी गाव चे माजी सरपंच श्री सोमनाथ हरेर, श्री सुधाकर कौसे राहुरी फॅक्टरी ,श्री दत्ताराम पोपळघट, श्री सिताराम विजय ,श्री विनायक मस्के, श्री विलास सोनटक्के, श्री अशोक दूधमकर ,श्री विवेक ननवरे, श्री गणेश भालके,श्री देवाभाऊ हरेर, श्री विलास लाड ,श्री शिवाजी दवणे, श्री पांडुरंग थोरात ,श्री चंद्रशेखर सोनवणे जेष्ठ नेते मंडळी युवावर्ग पदाधिकारी यांच्या उपस्थित व सर्वांच्या सहमतीने लवकरच समाजाच्या विकासासाठी एकत्रीकरण्याचा बुलंद आवाज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात घुमानार आहे कार्यक्रमाच्या प्रस्तावना सुरुवात सन्माननीय श्री प्रभाकरजी लाड साहेब
यांनी केली आभार प्रदर्शन माननीय श्री सुधाकरजी कौसे साहेबांनी केली

103
5196 views