logo

जे.पी. धरण परिसरात स्वच्छता मोहीम , रॉबिन हूड फाऊंडेशन आणि मदरअर्थ क्लीनअप ग्रुप यांच्यावतीने स्वच्छता मोहीम ,

अंबरनाथ - ८ जून रोजी रॉबिन हूड फाऊंडेशन आणि मदरअर्थ क्लीनअप ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जे.पी. धरण परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमात रॉबिन हूड आर्मीच्या स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: सुमीत, वर्षा, रूपा, कुमार, ममता, गुड्डू, दिव्या, अमेय, प्रवीण, गिरीश,अयान आणि रितिक. रॉबिन हूड फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “आम्ही यापूर्वीही अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा राबवल्या आहेत आणि भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करत राहू.” या मोहिमेद्वारे परिसरातील कचरा हटवून धरण परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वयंसेवकांच्या या कार्याने स्थानिक नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.मदर अर्थ क्लीन ग्रुप आणि रॉबिन हूड फाऊंडेशन यांनी केलेल्या या संयुक्त प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संरक्षणाला चालना मिळत असून, समाजात सकारात्मक बदल घडत आहेत.

3
523 views