logo

राहुरी फॅक्टरी येथे हॉटेल कामगाराचा मृत्यू..!

राहुरी फॅक्टरी येथे हॉटेल कामगाराचा मृत्यू..!

क्राईम रिपोर्टर :- जालिंदर आल्हाट
राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या हॉटेल जयश्री येथे काम करणाऱ्या भाऊसाहेब मुरलीधर पुंड रा देवळाली प्रवरा हे हॉटेल कामगाराचा चक्कर येऊन खाली पडल्याने डोक्याला मार लागल्याने उपचारापूर्वीच मयत झाल्याची घटना आज सोमवारी राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल जयश्री येथे घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,देवळाली प्रवरा येथील रहिवासी भाऊसाहेब मुरलीधर पुंड वय ६५ वर्षे हे राहुरी फॅक्टरी येथील हॉटेल जयश्री मध्ये वेटर काम करत होते.आज सकाळी साडे नऊ वाजेचा दरम्यान मयत भाऊसाहेब पुंड यांना चक्कर आल्याने ते जमिनीवर कोसळले जमिनीवर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले.घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांनी धाव घेऊन त्यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र वैद्यकीय सूत्रांनी मृत म्हणून घोषित केले.

मयत भाऊसाहेब पुंड यांच्या पश्चात पत्नी,मुलगा मुलगी असा परिवार असून दरम्यान याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

109
11466 views