logo

एसएससी बोर्डाच्या परीक्षेत कुमारी आशा वन्या वसावे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, सरी - तळोदा प्रकल्पाचा अभिमान

अक्कलकुवा प्रतिनिधी: गंगाराम वसावे
एसएससी बोर्डाच्या परीक्षेत कुमारी आशा वन्या वसावे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, सरी - तळोदा प्रकल्पाचा अभिमान
आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, सरी येथील विद्यार्थिनी कुमारी आशा वन्या वसावे हिने इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये ८४.४०% गुण मिळवून प्रकल्प स्तरावर मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण शाळा तसेच आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण आहे.

या यशामागे तिची मेहनत, जिद्द आणि शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे ठरले आहे. विशेषतः इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री. ओंकार एस. पाडवी, श्री. आर. ए. पाडवी तसेच मुख्याध्यापक श्री. डी. एस. वसवे यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. संपूर्ण शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
कुमारी आशा वसावे हिने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

39
786 views