गौरगांव येथिल वैष्णवी दादासाहेब पाटोळे हिचे घवघवीत यश
जिल्हा प्रतिनिधी (विकास वाघ धाराशिव.) कळंब तालुक्यातील गौरगाव येथील कु वैष्णवी दादासाहेब पाटोळे हिने दयानंद महाविद्यालय लातूर येथे इयत्ता बारावी मध्ये विज्ञान शाखेत ९२% गुण घेऊन सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला . ग्रामीण भागातील वैष्णवी हिचे प्राथामिक शिक्षण जि प प्रा शा गौरगाव येथे तर माध्यमिक शिक्षण येथीलच जयभवानी हायस्कूल येथे मराठी मेडीयम मधून झाले . तिने अकरावीत दयानंद महाविद्यालय लातूर येथे प्रवेश घेतला . विशेष म्हणजे घरची आर्थीक परिस्थिती खूप हालाखीची असून कुठलीही खाजगी ट्युशन न लावता अतिशय जिद्दीने व मेहनतीने अभ्यास करून हे यश संपादन केले.
या यशाबद्दल तिचे जि प प्रा शा गौरगाव येथील मुख्याध्यापक ढोले के एम, शिक्षक गोरे जी एम व विकास कापसे यांनी अभिनंदन केले.
यामुळे परिसरात सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.