logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जयेश शिंदे यांची शिरूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती निर्णायक ठराव.


शिरूर .(दिलीप शेलार )भारतीय जनता पक्षाच्या शिरूर तालुका अध्यक्ष पदी जयेश शिंदे यांची नियुक्ती जाहीर झाली ,त्यांच्या निवडीमुळे तालुक्याच्या राजकीय वातावरणात नवी उमेद नवा जोश आसा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
शिंदे हे पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांनी श्री क्षेत्र विठ्ठलवाडी या गावचे माजी उपसरपंच पद भूषावित तर कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि भाजप किसान मोर्चाचे सचिव म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक गोरगरीब समाजातील लोकांची महत्त्वाची कामे केली आहे.सामाजिक कामात त्यांचे सतत योगदान राहिले आहे. आणि गर्जुनपर्यंत त्यांनी सरकारी योजना पोहोचवण्यात उल्लेखनीय काम केले आहे.
निवडीनंतर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी जयेश शिंदे यांचे स्वागत केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुका भाजप पक्ष संघटना अधिक मजबूत होईल.असा विश्वास त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये होत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

136
1806 views

Comment