ग्राहक पंचायत महाराष्ट्र तर्फे नांदेडमध्ये कार्यशाळा संपन्न
नांदेडःग्राहक पंचायत महाराष्ट्र तर्फे नांदेड जिल्हा व हिंगोली जिल्ह्यातील सदस्यांसाठी एक दिवशीय संयुक्त अभ्यास वर्ग प्रशिक्षण एन एस बी कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाला . हया अभ्यास वर्गात नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले .त्याप्रसंगी राज्य अध्यक्ष डॉ . विजय लाड,राज्य सचिव अरुण वाघमारे हेमंत मराठे संभाजीनगर ( मार्गदर्शक )जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ . दिपक कासराळीकर,जिल्हा संघटक ॲड . आनंद कृष्णापुरकर,देगलूर तालुका अध्यक्ष सुभाष देगलूरकर, डॉ.रवींद्र बेंबरे, राष्ट्रीय पत्रकार संघ भारत चे राज्य कार्यकारी सदस्य वैजनाथ स्वामी, चंद्रशेखर लगडे, शंकरराव रायकोडे, महिला प्रतिनिधी सौ अनुसया सुभाष देगलुरकर, आदी सदस्य उपस्थित होते .