शिरूर बाजार पेठेत कोयत्याने दहशत निर्माण करणाऱ्या तिघा हल्लेखोरांच्या शिरूर पोलीसांनी आवळल्या मुसक्या
शिरूर -दिलीप शेलार
शिरूर शहरातील बाजारपेठेत धारदार शस्त्रांचा धाक दाखवित, कोयता हातात घेऊन एका खताच्या दुकानात घुसून तेथील कामगारावर कोयता आणि कात्रीने जीवघेणा हल्ला करून पळून गेलेल्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात शिरूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या हल्लेखोरांकडून कोयत्यासह काही शस्त्रेदेखील जप्त करण्यात आली आहेत.
परवेज उर्फ पाप्या अस्लम पठाण (वय-१९), रूपेश राजू चित्ते (वय-२२) व ओंकार दत्तात्रेय जाधव (वय-२६, तिघे रा. तर्डोबाची वाडी, ता. शिरूर, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.बाजारपेठेत कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या या हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे.या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले