logo

लोणीकंद ता. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाडेगाव परिसरात हातभट्टीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी हातभट्टी तयार करणाऱ्या एकास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन तेरे, पोलीस हवालदार सागर जगताप, पोलीस शिपाई शुभम चिनके आणि सुधीर शिवले यांनी ही कारवाई केली.

दि. 10 एप्रिल 2025 रोजी वाडेगाव येथील चव्हाण वस्तीजवळ मुळा-मुठा नदीकिनारी असलेल्या मोकळ्या जागेवर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

या प्रकरणी पत्थर सिंग राजपूत रा. वाडेगाव, ता. हवेली, जि. पुणे या इसमाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत. अवैध धंद्याविरुद्ध कारवाई सुरूच राहील, असे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी सांगितले.

14
1360 views