आंबी व दवणगाव परीसरात हनुमान जयंती साजरी
आंबी राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील आंबी, अंमळनेर,दवणगाव,संक्रापूर, केसापूर,पिंपळगाव फुणगी सह आदि गावामध्ये श्रीरामभक्त श्री हनुमान जन्मोत्सव पहाटे उत्साहात साजरा करण्यात आला.
आंबी येथील श्री हनुमान मंदीरात वै.गुरुवर्य विश्वनाथ बाबा भजनी मंडळाचे हरिभजन जन्माचे अभंग होऊन आरती झालीं.यजमान विठ्ठल सो. कोळसे यांनी चहापाणी दिले तर अंमळनेर मध्ये मा.सरपंच रोहण जाधव,प्रमोद जाधव, यांनी प्रसाद वाटप केला. दवणगांव येथे श्री हनुमान देवस्थान ट्रस्टच्या वतीने पौराहित्य अशोक गुरु यांच्या उपस्थीत रुद्राभिषेक होऊन चिंचोलीचे ह.भ.प. पठारे महाराज यांची प्रवचन सेवा झाली, यजमान श्री. खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष दिलीप होन, मॅजर रविंद्र खपके,ग्रा.पं.सदस्य शिवाजी खपके, निवृत्ती खपके यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, पिंपळगाव येथे स्थानिक हनुमान भक्त,ग्रामस्थ यांनी भाविकांना महाप्रसाद वाटप केला. या कार्यक्रमास आंबीचे सरपंच बाळासाहेब साळुंके, अंमळनेर सरपंच कोंडीराम साळुंके,उपसरपंच किरण कोळसे, मॅनेजर अशोक जाधव, मनोहर साळुंके, संजय कोळसे सर,भगवान जाधव ,सतिश पा.जाधव,प्रमोद जाधव, भाऊसाहेब तेलोरे, सुनिल औताडे, अजित जाधव,राजू भाग्यवंत,नरेंद्र डुकरे, डॉ. जाधव,डॉ.सालबंदे कुंडलीकराव खपके, देवमन भगत,अशोक टाकसाळ, सुनिल टाकसाळ, सुदाम खेमनर,रामराव होन, प्रताप चव्हाण,घोसाळे महाराज, बाळकृष जाधव, प्रशांत चव्हाण,राजेंद्र ढोलक, राजेंद्र रोडे पिंपळगाव फुणगी सरपंच शिवाजी जाधव, वडितके, गर्ध,फुणगे, तोरे, पत्रकार विश्वनान जाधव यांच्या सह आदि उपस्थीत होते.