logo

मध्य रेल्वेवर होतंय आणखी एक स्थानक; बदलापूरकरांचा प्रवास सुस्साट होणार, 30 मिनिटांतच...

मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी सोप्पा आणि जलद व्हावा यासाठी रेल्वेकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. रेल्वेकडून अनेक प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकलची गर्दी वाढत चालली आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकापुढील शहरातून नवी मुंबईत येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या मार्गावर आणखी एक रेल्वे स्थानक होणार आहे. यामुळं बदलापूरकरांचा प्रवास आणखी सोप्पा होणार आहे. 
वांगणी-बदलापूर स्थानकांदरम्यान कासगाव रेल्वे स्थानक होणार आहे. कासगाव-कामोठे-मानसरोवर नवीन रेल्वेमार्ग तयार केला जाणार आहे. त्यामुळं बदलापूर 30 मिनिटांत नवी मुंबई गाठता येणार आहे. रेल्वे स्थानकासह नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. 
मध्य रेल्वेच्या बहुप्रतिक्षित वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यानच्या कासगाव रेल्वे स्थानकाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळालीय. महत्त्वाचं म्हणजे नवीन कासगाव रेल्वे स्थानकापासून मोरबे- कामोठे-मानसरोवर असा रेल्वेमार्गही तयार केला जाणार आहे. त्यामुळे बदलापूरकरांना अवघ्या 30 मिनिटात नवी मुंबई गाठता येईल अशी माहिती बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी दिली आहे. 
बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून लोकल वाहतुकीवर प्रचंड ताण वाढलाय. त्यामुळे बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांदरम्यान कासगाव स्थानकाची निर्मिती करून मोरबे-कामोठे मार्गाद्वारे हे स्थानक नवी मुंबईला जोडण्यात यावे यासाठी राम पातकर प्रयत्नशील होते. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच रेल्वे अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून बैठकाही घेतल्या होत्या. त्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनानं कासगाव रेल्वे स्थानकासह नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिलीय. 
हा नवा रेल्वे मार्ग झाल्यास कासगाव ते कामोठे हे 18 किलोमीटरचं अंतर 10 ते 15 मिनिटांत पार करता येईल. तसेच बदलापूरहून नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटांत जाता येईल. याशिवाय नव्या रेल्वे मार्गामुळे बदलापूर तसेच वांगणी परिसर बदलापूर तसेच वांगणी परिसराला नवी मुंबई एअरपोर्टची कनेक्टिव्हिटीही मिळेल. त्यामुळे आता कासगाव रेल्वे स्थानकासह नव्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.

200
9396 views