logo

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त अक्कलकुवा शहरातील कुबेर पार्क येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकुवा (गंगाराम वसावे)
भारतीय जनता पक्षाने आपल्या विचारधारेशी तडजोड न करता गेली अनेक वर्षे सतत काम करत राहिली त्याचे फलित झाले असून या पक्षातील अनेक दिवंगत नेत्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त दिनांक सहा एप्रिल २०२५ रोजी अक्कलकुवा शहरातील कुबेर पार्क येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पक्षाच्या स्थापना दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातुन माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवा भारत आकारास येत असून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्ष संघटन वाढवून कधी नव्हे ते यश प्राप्त झाले आहे असेही सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, नितेश वळवी, सरपंच जयमलसिंग पाडवी सरपंच भूपेंद्र पाडवी उपसरपंच विनोद कामे ,अनिल पाडवी माजी पंचायत समिती सदस्य अशोक राऊत ,सुधीर पाडवी, महेश तवर, विनोद जैन, मनोज सोनार, बापू महिरे प्रमुख उपस्थितीत होते.
आज दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त अक्कलकुवा शहरातील कुबेर पार्क येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच भारतीय जनता पक्षातील दिवंगत महानेत्यांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी पक्षाच्या इतिहासावर प्रकाश टाकत गेल्या भारतीय जनता पक्ष देशहितासाठी व प्रखर राष्ट्रवादी विचाराने सतत गेली अनेक वर्षे झटत असून आपले विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत असल्याने आज देशातच नव्हे तर जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असून देशावर व अनेक राज्यांमध्ये सत्तेवर आला आहे देशात केवळ भारतीय जनता पक्षाचे दोनच आमदार निवडून आले होते त्यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील दिवंगत नेते कैलासवासी दिलवरसिंग दादा पाडवी त्यापैकी एक होते त्यांच्या वारसा पक्षनिष्ठेने आज तागायत प्रामाणिकपणे पक्ष संघटनेसाठी जपला आहे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यांनी देखील भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांच्या हितासाठी व देशाच्या कल्याणासाठी संरक्षणासाठीच्या प्रखर देशभक्ती निर्माण करणारा पक्ष असल्याने या पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचल्याने भरभराटीस आला आहे यामागे अनेकांचे मोठे योगदान आहे ते विसरता येणार नाही. यावेळी उपसरपंच विनोद कामे यांनी देखील मनोगत व्यक्त केले यावेळी उरशा नाईक, जयपाल वसावे, राहुल शुक्ला, भूषण पाडवी ,शुभम पाडवी, रायसिंग वसावे, मनोज पाडवी ,अनिल सूर्यवंशी, सुनील सोनवणे, उमेश पाडवी, कृष्णा साळवे, राहुल वसावे, सुरेश वसावे ,वैभव पाडवी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

39
3349 views