logo

अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाटात ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प

अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाटात ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्प :अक्कलकुवा प्रतिनिधी:(गंगाराम वसावे)
अक्कलकुवा मोलगीदरम्यान असलेल्या देवगोई घाटात सकाळी नऊ वाजेच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अवजड - ट्राला उलटल्याने अपघात घडला. यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही.

अक्कलकुवाहून मोलगीच्या दिशेने जाणारा अवजड ट्राला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास देवगोई घाटाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उलटला. गेल्या काही वर्षांपूर्वी अक्कलकुवा ते मोलगीदरम्यान रस्त्याचे

रुंदीकरण करण्यात आले आहे. यामुळे यावरुन वाहतूकीचे प्रमाणदेखील वाढले आहे. यामुळे साहजिकच अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, काल सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अक्कलकुवाहून मोलगी कडे जणाऱ्या ट्रालावरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उलटला. यामुळे क्रेनच्या मदतीने ट्रालाला सरकविण्यात आले. यादरम्यान या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. घाटाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अक्कलकुवा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पवार यांनी सांगितले.

5
110 views