logo

देहली नदीवरील फरशी पुलासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर

**देहली नदीवरील फरशी पुलासाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर **
अक्कलकुवा प्रतिनिधी :(गंगाराम वसावे)अक्कलकुवा या तालुक्यातील खापर ते आमलीफळी ण दरम्यान देहली नदीवर असलेल्या फरशी पुलाचे चारवेळा उद्घाटन होऊन जी देखील पुलाच्या बांधकामाला मुहुर्त मिळाला नाही. पुलाचे काम रखडत राहिले वाला राजकीय श्रेयवादाचा मुद्दाही ती कामी प्रमाणात कारणीभूत आहे. या च्छा पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर अखेर या पूलाच्या कामासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आतातरी पुलाचे काम मार्गी लागेल ही अपेक्षा करायला हरकत नाही.

अक्कलकुवा तालुक्यातील खापर आणि आमलीफळी या दोन गावांच्या मधोमध देहली नदी वाहते. या दोन्ही गावांना एकमेकांशी जोडणारा फरशीपूली देहली नदीवर बांधण्यात आला आहे. पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत

असल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दरवर्षी जीवितहानी होत असते. यामुळे पुलाची उंची वाढविणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने माजी मंत्री के सी. पाडवी यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात सन २०२१ मध्ये या पूलासाठी निधी मंजूर केला होता. परंतु, सन २०२२ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारचा तख्तापलट झाला. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने सर्व विकास कामांना स्थगिती दिली. यामुळे पुलाच्या कामासाठी मंजूर झालेला निधी मिळाला नाही आणि या पुलाचे काम अपूर्णच राहिले. पुढे अॅड. पाडवी यांनी न्यायालयात दाखल मागितल्यानंतर सन २०२३ मध्ये पुलाच्या कामावरील स्थगिती उठविण्यात आली. यामुळे पुलाचे काम मार्गी लागेल ही संभावना होती पण ती धुसर ठरली. पुलाच्या कामाचे श्रेय

लाटण्याची स्पर्धा राजकारण्यांमध्ये रांगली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अॅड. के सी. पाडवी यांनी पुलाच्या कामाचे उद्घाटन केले. त्यापूर्वी नंदुरबारच्या माजी खा. डॉ. हीना गावित यांनी दोनवेळा पुलाच्या कामाचा नारळ वाढवला. खापर जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीवेळी गीता पाडवी यांनी पुलाच्या कामाचे उद्घाटन करण्याचा मुहूर्त साधून घेतला; पण, कामाला ही सुरू झाली नाही. या फरशी पुलाची पाहणी करण्यासाठी मुंबईतील अधिकाऱ्यांचे पथक आले होते. पण केवळ पाहणीचे सोपस्कर करून पथक मुंबईला परतले, पुढे काही झाले नाही. आता अक्कलकुव्याचे आ. आमश्या पाडवी यांनी पुलाच्या कामाचा विडा उचलला हे बरे झाले. केवळ यावरच न थांबता आ.पाडवी यांनी फरशी

देहली प्रकल्पामुळे येतो पूर

अक्कलकवा तालुक्यातील आंबाधारी येथे देहली नदीवर धरण बांधण्यात आले आहे. या देहली प्रकल्पामुळे पावसाळ्यात नदीच्या प्रवाहात वाढ होते आणि मोठा पूर येतो. यामुळे आमलीफळी आणि खापर या दोन गावांच्या माधील फरशीपूल पाण्याखाली जातो आणि आमलीफळी ग्रामस्थांचा संपर्क तुटतो हा प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.

पुलाच्या कामासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपयांचा निधी ही मंजूर आणला. यामुळे लवकरच पुलाच्या कामाला सुरुवात होईल आणि आमळीफळी ग्रामस्थांची पावसाळ्याच्या दिवसात

होणारा हेळसांड थांबेल ही अपेक्षा करणे काही गैर नाही. आता आ. पाडवी पुलाच्या कामाचा प्रत्यक्ष नारळ कधी वाढवतात याकडे लक्ष लागले आहे. आखिर मा.उपसरपंच ललित जाट व लक्ष्मण वाडिले यानी या विकास कामगिरी बद्दल हृदयपूर्वक मा. आमदार आमश्या पाडवी यांचे पत्रकार परिषदेत मानले आभार .

6
2043 views