मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेतील लाभार्थ्यांची लॉटरी पध्दतीने निवड
नांदेड दि. 26 मार्च :-अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबत योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च 2017 च्या शासन निर्णयान्वये सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र बचतगटांनी सन 2023-24 साठी http://mini.mahasamajkalyan.in/ या संकेतस्थळावर लाभार्थ्यांचे ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या बचतगटांची संख्या उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त असल्यामुळे लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने उद्या 27 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नांदेड येथील सभागृहामध्ये करण्यात येणार आहे. तरी लॉटरी पध्दतीने निवड करण्यासाठी पात्र अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.00000