logo

"टी बी हारेगा, इंडिया जीतेगा" या मोहिमेसाठी नेते विरुद्ध अभिनेते यांच्यात रंगला क्रिकेट सामना






धाराशिव (प्रतिनिधी) 'टीबी मुक्त भारत' या महत्वाकांक्षी अभियानाच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री मा. श्री. अनुराग ठाकूर यांच्या पुढाकाराने मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल (BKC) येथील एमसीए क्रिकेट मैदानावर विशेष क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले.या सामन्यामध्ये नेते संघाकडून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सहभागी होत फलंदाजी व गोलंदाजीचा आनंद घेतला.'नेते' विरुद्ध 'अभिनेते' अशा दोन संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या या रोमांचक सामन्यात अभिनेता संघाने विजय मिळवला.



सामना अत्यंत अटीतटीचा झाला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजी करत सामना रंगतदार केला. अखेरच्या षटकात अभिनेता संघाने शानदार कामगिरी करत नेते संघावर विजय मिळवला. या सामन्यात खेळाडूंनी क्रिकेटच्या माध्यमातून क्षयरोगाविषयी जनजागृती करण्याचा संदेश दिला.



या विशेष सामन्याच्या निमित्ताने क्षयरोग निर्मूलन मोहिमेस चालना देण्याचा उद्देश होता. उपस्थित मान्यवरांनी आणि खेळाडूंनी 'टीबी मुक्त भारत' या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. समाजात क्षयरोगाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि लोकांनी वेळीच उपचार घ्यावेत, यासाठी अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित झाले.



कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे विशेष कौतुक करण्यात आले. या उपक्रमामुळे टीबी मुक्त भारताच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.






















12
2608 views