
सहावीत नापास झालेली मुलगी कशी बनली IAS? रुक्मणी यांची कहाणी देईल प्रेरणा.........!
एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी शाळेत नापास झाला असेल तर त्यांच्याकडे बघायचा दृष्टीकोन बदलतो. हा विद्यार्थी भविष्यात काहीच करणार नाही, असे त्याला काहीजण हिणवतात. पण असे विद्यार्थी पुढे जाऊन आयएएस विद्यार्थी आयएएस होईल, असे कोणी सांगितलं तर त्या भविष्यवाणीवर कोणी विश्वास ठेवेलं का? निश्चितच नाही. पण असं प्रत्यक्षात घडलंय. आजच्या यशोगाथेत आपण एका आयएएस अधिकाऱ्याबद्दल जाणून घेऊया. जी अधिकारी सहावीत नापास झाली पण पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. ही कहाणी आहे आयएएस रुक्मिणी रियार यांची.
पण हार मानली नाही
जर कोणी शाळेत नापास झाला तर तो आयुष्यातही नापास होईल, असा त्याचा अर्थ नाही, हे रुक्मणी यांच्या कहाणीतून कळते. दरवर्षी सुमारे 10 लाख उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेला बसतात. परंतु त्यापैकी काहीजण पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होतात. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलिस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि इतर पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. यूपीएससी उत्तीर्ण करुन उत्तीर्ण झालेल्या आयएएस रुक्मिणी रियार सहावीत नापास झाल्या होत्या. पण त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली.
शिक्षण
रुक्मिणी यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गुरुदासपूर येथून पूर्ण केले. चौथी इयत्तेत डलहौसी येथील सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठातून सामाजिक शास्त्रात पदवी पूर्ण केली. पुढे जाऊन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मुंबई येथून सामाजिक शास्त्रांमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. रुक्मिणी यांनी मुंबईतील आशोधा, म्हैसूर आणि अन्नपूर्णा महिला मंडळात इंटर्नशिप केली. एनजीओमध्ये असताना त्यांना नागरी सेवांमध्ये रस निर्माण झाला. मग त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
कसं मिळवलं यश?
2011 मध्ये रुक्मिणीने तिच्या पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश मिळवले. एवढेच नव्हे तर ऑल इंडिया 2 रँक मिळवला. विशेष म्हणजे रुक्मणी यांनी कोणत्याही कोचिंग क्लासची मदत न घेता केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर हे यश मिळवले. एनसीईआरटीची पुस्तके, वर्तमानपत्रे आणि मासिकांच्या मदतीने आपण तयारी केल्याचे रुक्मणी सांगतात. सहावी ते बारावीपर्यंतची एनसीईआरटीची पुस्तके पूर्णपणे वाचली आणि नियमितपणे वर्तमानपत्रे आणि मासिके वाचून यूपीएससीची तयारी केल्याचे रुक्मणी सांगतात.
सहावीत नापास
विशेष म्हणजे रुक्मणी या अभ्यासात फार हुशार नव्हत्या. यामुळे त्या सहावीत असताना अनुत्तीर्ण झाल्या. पण यानंतर त्यांनी स्वत:वर खूप मेहनत घेतली आणि आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.