logo

300 KM फक्त 30 मिनिटांत ! विमानापेक्षाही फास्ट धावेल ट्रेन, भारतात बनणार आशियातील सर्वाधिक लांबीची Hyperloop Tube......

 दिल्ली ते मुंबई किंवा मुंबई ते पुणे अवघ्या काही तासांत तुम्ही पोहोचू शकणार आहात. हवाई मार्गापेक्षाही जलद प्रवास तेही ट्रेनने होणार आहे. लवकरच हे स्वप्न साकार होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी रविवारी भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी) मद्रासमध्ये विकासाच्या दृष्टीने असलेल्या महत्त्वकांक्षी असलेला हायपरलूप प्रकल्प आशियातील सर्वाधीक लांबीची हायपरलूप ट्यूब असणार आहे. या प्रकल्पाची लांबी 410 मीटर असून लवकरच ही जगातील सर्वाधीक लांबीचा हायपरलूप प्रकल्प असणार आहे. 
केंद्रीय मंत्र्यांनी आयआयटी मद्रासमध्ये हायपरलूप प्रकल्पाचे निरीक्षण केले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, हायपरलूप प्रकल्पासाठी इलेक्ट्रॉनिक्स घटक चेन्नईतील इंटीग्रेल कोच फॅक्ट्रीत तयार केले जात आहेत. रविवारी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, आयआयटी मद्रास परिसरातील आपला दौऱ्याचा एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, आशियातील सर्वात लांबीचा हायपरलूप ट्यूब (410 मीटर) लवकरच जगातील सर्वात लांबीचा प्रकल्प होणार आहे. 
2013 मध्ये, एलॉन मस्कने 'हायपरलूप अल्फा' या श्वेतपत्रिकेद्वारे हायपरलूपची कल्पना जगासमोर मांडली. हायपरलूप हे वाहतुकीचे पाचवे साधन मानले जाते. ही एक हाय-स्पीड ट्रेन आहे जी जवळजवळ रिकाम्या (व्हॅक्यूम) ट्यूबमध्ये धावते. ट्यूबमधील हवेचा दाब खूप कमी असल्याने त्याचे कॅप्सूल (ज्यामध्ये प्रवासी बसतात) ताशी 1,000 किलोमीटरपेक्षा जास्त वेग गाठू शकते.

Hyperloop trains: 8.34 कोटी रुपयांची मंजुरी

एलॉन मस्कने 2013मध्ये एक वॉइट पेपर-हायपरलूप अल्फाच्या माध्यमातून जगासमोर नवीन पर्याय समोर आणला आहे. ट्यूबच्या आत हवा नसल्या कारणामुळं फ्रिक्शन खूप कमी होते. यामुळं कॅप्सूल हवेत तरंगत असल्याप्रमाणे, अगदी कमी उर्जेचा वापर करून खूप जास्त वेगाने फिरू शकते. त्यामुळं त्याचा वेग ताशी 1000 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकतो. मे 2022 मध्ये, रेल्वे मंत्रालयाने आयआयटी मद्रासला भारतात हायपरलूप प्रणाली आणि त्याचे घटक तयार करण्यासाठी 8.34 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते.

174
10372 views