logo

हेमंत परदेशी व गंगाराम वसावे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार प्रदान....

*हेमंत परदेशी व गंगाराम वसावे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार प्रदान....*

*पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची दखल....*

प्रतिनिधी- खापर
माहिती अधिकार,पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेना तथा इंडिया २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानाने चंद्रपूर येथे ६ वा वर्धापनदिन व महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार कार्यक्रम सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक मां.रमेशकुमार बोरकुटे ,माजी मंत्री तथा बदलापूर विधानसभा आमदार सुधीर मुनगंटीवार तर अध्यक्ष चंद्रपूर विधानसभा आमदार किशोर जोरगेवार होते.
वर्धापन दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. विविध क्षेत्रात परिश्रम घेऊन जनहितासाठी झटणाऱ्या त्या व्यक्तीला पुनश्च ऊर्जा प्राप्त व्हावी व निरंतर समाजकार्य करत रहावे या हेतूने माहिती अधिकार,पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेना तथा इंडिया २४ न्यूज यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या सत्कार सोहळ्यात अक्कलकुवा तालुक्यातील समाजसेवक तथा झुंजार पत्रकार गंगाराम वसावे व हेमंत परदेशी यांची वर्णी लागली आहे.
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक रीना जनबंधु,केंद्रीय अल्पसंख्यांक आयोग सदस्य डॉ.अविनाश संकुडे यांचे उपस्थितांना मार्गदर्शन लाभले. तर प्रसंगी चिमूर विधानसभा आमदार बंटी दांडिया,चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गोडा, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, बरोरा विधानसभा आमदार करण देवतळे,राजुरा विधानसभा आमदार देवराव भोंगळे, संघटनेचे महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष व इंडिया 24 न्यूज चैनल चे मुख्य संपादक मा .तुळशीराम ह. जांभुळकर, मा.सो. शिल्पाताई बनपुरकर महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष, मुकेश कुमार टांगणे,विपिन पालीवाल,डॉ.महादेव चिंचोळे तसेच राज्यभरातून शेकडोंच्या संख्येने उपस्थिती होती.

*परदेशी वसावे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षांव.....*
हेमंत परदेशी हे खापर येथील रहिवासी असून व्यवसाय करतात तर छंद पत्रकारिता जोपासतात.आपल्या निर्भीड पत्रकारितेच्या बळावर अनेक गरजूंना न्याय मिळवून दिला आहे.तसेच गंगाराम वसावे यांचे गोरगरीबांसाठी अहोरात्र परिश्रम घेणे व उत्कृष्ट पत्रकारिता याची दखल घेण्यात आली आहे. परदेशी व वसावे यांना पुरस्कार प्रदान झाल्याने पत्रकारिता,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,अध्यात्मिक सह सर्वच क्षेत्रात शुभेच्छांचा वर्षांव होत आहे.

फोटो- चंद्रपूर येथे झालेल्या वर्धापन दिन व महाराष्ट्र रत्न गौरव सत्कार कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्विकारतांना पहिल्या छायाचित्रात हेमंत परदेशी व दुसऱ्या छायाचित्रात गंगाराम वसावे सोबत उपस्थित मान्यवर.

11
1385 views