जागतिक महिला दिनानिमित्त
पुष्परत्न बहुद्देशीय सेवाभावी संस्था आणि आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक यांच्या वतीने कार्यक्रमाध्यक्षा पुस्तकांची आई मा.भीमाबाई जोंधळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान.....
कार्यक्रमाचे उद्घाटक मा.दत्ता मते संस्थापक सुजाता शिक्षण प्रसारक मंडळ,परभणी व संचालक, विळवंडी विद्यालय,ता.दिंडोरी,प्रमुख पाहुणे मा.सागर आडगांवकर अँण्ड सन्स चे मालक मा.सागर आडगांवकर,मिस.ग्लोबल वल्डॅ मा.डाॅ.स्वराली देवळीकर मा.सिने अभिनेञी रुपाली पवार व कवीसंमेलनाध्यक्षा मा.माधुरी अमृतकार,दैनिक पुण्यनगरीचे मा.कैलास बडगुजर,पी एस आय-राम घोरपडे आणि कार्यक्रमाचे आयोजक प्रा.डाॅ.आनंद रत्नाकर आहिरे अध्यक्ष-पुष्परत्न बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व संचालक आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी,नाशिक उपस्थित होते.
जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपयाचा धनादेश, *,सन्मानचिन्ह,सन्मानपञ,सोनी पैठणी तर्फे *मानाचा शेला*,सागर आडगांवकर यांच्या कडून *चांदीची फ्रेम*,मा.गायञी भांडारी यांच्या तर्फे *बॅग*,व प्रतिभा सुर्यवंशी यांच्या तर्फे *नथ* सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी या सोहळ्यात महाराष्ट्रभरातील 50 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यामध्ये नाशिक जिल्हापरिषद वैद्यकीय अधिकारी मा.डाॅ.मंदाकीनी दाणी, मा.डाॅ.दिपाली सोनवणे,नाशिक प्रा.प्राजंली फरकाडे, लेकुरवाळे,मोर्शी,अमरावती डाॅ.स्मिता मोरे,नाशिक,मा.योगिता दत्ता मते,परभणी,मा.नुतन शरद पवार,नाशिक,मा.जुही सिंह,मिरा रोड,डाॅ.आशा पारधे,नाशिक, मा.शुभांगी गादेगांवकर,भाईंदर,मा.सुनिता महाजन,भाईंदर,मा.अँड जोत्सना चार्वाक कांबळे,नाशिक,मा.पौर्णिमा पाटील,कल्याण,मा.प्रिती मोरे,धुळे,मा.अर्चना परदेशी,लासलगाव,मा.शारदा अशोक पाटील,धुळे,मा.प्रतिभा पवार बहादरपूर,मा.सुनंदा सुर्यवंशी नाशिक,मा.तृप्ती पाटील,उल्हासनगर,मा.शोभा वेले,नागपुर,मा.डाॅ.अनिता कांबळे,रायगड,आदींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
महिला दिनाचे औचित्य साधत याच कार्यक्रमात दैनिक पुण्यनगरी तर्फे एम.पी. एस.सी व यु.पी. एस.सी च्या विद्यार्थ्यांसाठी अंक सुरु झालेला आहे. तीन महिने आहिरे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी तीस अंक विनामूल्य आहिरे अकॅडमीचे संचालक प्रा.डाॅ.आनंद आहिरे यांनी सेरु केले या अंकाचे प्रकाशन या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दुपार सञानंतर राज्यस्तरीय कवीसंमेलनाचे आयोजन कवीसंमेलनाध्यक्षा मा.माधुरी अमृतकार होत्या तर सुञसंचालन कवयिञी प्रिती मोरे यांनी केले. करण्यात आले होते.
पुष्परत्न बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत. विशेषतः साहित्य आणि काव्य क्षेत्रातील नवोदित कवींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.महिला कवीसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
या विशेष सोहळ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे महिला कवीसंमेलन होते. राज्यभरातून अनेक नामवंत तसेच नवोदित महिला कवी सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आपल्या अप्रतिम काव्यसादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्परत्न बहुद्देशीय संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांनी महिला सशक्तीकरण, त्यांच्या योगदानाचे महत्त्व आणि साहित्य क्षेत्रात महिलांच्या सहभागाबद्दल मार्गदर्शन केले.उपस्थित सर्वांनी कार्यक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमास सोनी पैठणी तर्फे पाहुण्यांना मानाचा शेला व 3 पैठण्या उपस्थितांमधून कुपन द्वारे प्रदान करण्यात आल्या.तर सागर आडगांवकर अँण्ड सन्स कडून पाहुणे व पुरस्कारर्थींना चांदीची फ्रेम सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आली.तर मा.गायञी भांडारी,नाशिक यांच्यातर्फे पाहुण्यांना बॅग प्रदान करण्यात आली तर मा.प्रतिभा सुर्यवंशी यांच्यातर्फे पाहुण्यांना नथ प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाला महाराष्टातून प्रचंड प्रतिसाद होता.संपूर्ण कार्यक्रमाचे सूञसंचालन मा.दिपक आहिरे यांनी केले.