logo

रेल्वे गाड्यांची नावे कशी ठेवली जातात? पाहूयात सविस्तर......

भारतातील प्रत्येक रेल्वेला एक विशिष्ट नाव असते जसे की, हमसफर एक्सप्रेस, महाकाल एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस. पण यांचे नाव कसे ठेवण्यात आले हे अनेकांना माहित नाही. तर जाणून घेऊयात या रेल्वेची नावे कशावरुन ठेवण्यात आली. 
गाड्यांची नावे ठरवण्याची प्रक्रिया 
रेल्वे गाड्यांची नावे खूप विचारपूर्वक आणि विविध पैलूंवर आधारित असतात. या प्रक्रियेत देशाची संस्कृती, इतिहास, भूगोल तसेच त्या गाडीच्या मार्गाचा किंवा तिच्या उद्देशाचा विचार केला जातो. रेल्वे मंत्रालय, राज्य सरकारे आणि रेल्वे झोन यांकडून याबाबत सूचना घेतल्या जातात आणि शेवटी अंतिम निर्णय रेल्वे मंत्रालय घेतो.
गाड्यांची नावे आणि त्यामागील विचार
1. हमसफर एक्सप्रेस - ही ट्रेन प्रवाशांमधील बंधन आणि प्रवासातील साथीदारपणाचा प्रतीक आहे.
2. महाकाल एक्सप्रेस - उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराला समर्पित आहे.
3. बुद्ध पौर्णिमा एक्सप्रेस - भगवान बुद्धांना समर्पित असलेली गाडी आहे.
4. गोदावरी एक्सप्रेस - ही ट्रेन गोदावरी नदीच्या आसपासच्या परिसराला ओळख दाखविणारी आहे.
5. सिंधू दर्शन एक्सप्रेस - सिंधू नदी आणि तिच्या सांस्कृतिक वारशाला समर्पित करण्यासाठी या ट्रेनचे नाव सिंधू दर्शन एक्सप्रेस ठेवले. 
6. वंदे भारत एक्सप्रेस - देशभक्ती, स्वावलंबन आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे.
7. जन शताब्दी एक्सप्रेस - लोकांना जलद आणि स्वस्त दरात रेल्वे सेवा देण्यासाठी चालवली जाते.
8. राजधानी एक्सप्रेस - देशाची राजधानी, दिल्लीला जोडणारी महत्त्वाची ट्रेन आहे.
नाव ठरवण्याचे अंतिम अधिकार  
रेल्वे गाड्यांच्या नावांचा निर्णय रेल्वे बोर्ड घेते. त्यासाठी संबंधित राज्य सरकारे आणि रेल्वे झोनकडून सूचना घेतली जातात. गाडीच्या मार्ग, उद्देश आणि वैशिष्ट्यांवर आधारित तिचे नाव ठरवले जाते. तरीही अंतिम निर्णय हा रेल्वे मंत्रालयाकडे असतो.

138
5690 views