अक्कलकुवा तालुक्यातील रामभक्त अयोध्या येथे रवाना.
अक्कलकुवा प्रतिनिधी (गंगाराम वसावे) अक्कलकुवा तालुक्यातील रामभक्त अयोध्या येथे रवाना.
अक्कलकुवा तालुक्यातील काकडीआंबा, तालंबा, पेचरीदेव, पोरांबी, गव्हाळी, खडकुना ,टावली व डोडवा या गावातील 80 ते 90 युवक श्री राम मंदिर अयोध्या धाम दर्शनासाठी रवाना झाले असून त्यात शिवसेनेचे सरपंच, उप सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे देखील रवाना झाले आहेत .त्या अनुषंगाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समाज कल्याण माजी सभापती शंकर पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य कपिल देव चौधरी , संजय ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.