परिचारिका पदविका परीक्षेत रीना तडवी चे घवघवीत यश
विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण.
अक्कलकुवा प्रतिनिधी (गंगाराम वसावे)
परिचारिका पदविका परीक्षेत रीना तडवी चे घवघवीत यश
विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण.
खापर येथील रीना प्रभू तडवी हिने तीन वर्षाच्या परिचारिका पदविका जी एन एम अभ्यासक्रमात येवला येथील महाविद्यालयातून परीक्षा देऊन 71 टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह हा अभ्यासक्रम पूर्ण केला असून रीना तडवी ही पत्रकार प्रभू तडवी यांची मुलगी असून अतिशय हलाखीच्या व गरिबीच्या परिस्थितीतून तिने शिक्षण पूर्ण करून हा अभ्यासक्रम विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केल्यामुळे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा ,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल जावरे, जसपाल वळवी, कमलेश शिंदे, हेमंत परदेशी ,रवींद्र गुरव, नितीन चौधरी ,इम्रान पठाण, गंगाराम वसावे यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकारांनी रीना तडवी हिचे अभिनंदन केले.