logo

आज अक्कलकुवा येथे रमजान ईद, आगामी शिवजयंती, होळी, धुलीवंदन, रंगपंचमी अनुषंगाने मा. श्री. श्रवण दत्त, पोलीस अधीक्षक, नंदुरबार जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमेटीची बैठक संपन्न

अक्कलकुवा प्रतिनिधी (गंगाराम वसावे )
आज दिनांक 04/03/2025 रोजी 16.30 वाजता रमजान ईद, आगामी शिवजयंती, होळी, धुलीवंदन, रंगपंचमी अनुषंगाने मा. श्री. श्रवण दत्त, पोलीस अधीक्षक, नंदुरबार जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीस मा. श्री. दर्शन दुगड, सहाय्यक पोलीस अधीक्षक, अक्कलकुवा उपविभाग अक्कलकुवा, श्री. हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व आम्ही प्रभारी अधिकारी अक्कलकुवा पोलीस स्टेशन व अक्कलकुवा पोलीस स्टेशन हद्दीतील हिंदू व मुस्लिम प्रतिष्ठित नागरिक असे उपस्थित होते. सदर बैठकीत माननीय पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी मार्गदर्शन केले की, सदर रमजान ईद अनुषंगाने व शिवजयंती व इतर सणाच्या अनुषंगाने कोणीही आक्षेपार्ह मॅसेज व्हायरल करणार नाही. अफवावर विश्वास ठेवणार नाही. कोणीही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणार नाही. कोणाला कोणत्या घटने संदर्भात काही मॅसेज, व्हिडिओ प्राप्त झाला असेल तर त्याची खात्री केल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवू नये. सदर बाबत पोलिसांची काही मदत लागल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधा. कोणाला तात्काळ मदत लागल्यास टोल फ्री नंबर डायल ११२ चा वापर करा. बाबत योग्य त्या सूचना दिल्यात. सदर शांतता कमिटी बैठक 16.30 वाजता सुरू होऊन 17.15 वाजता संपली आहे. सदर बैठकीस हिंदू व मुस्लिम समाजबांधव हे 60 ते 70 असे उपस्थित होते.
.

50
3666 views