logo

शाहू महाराज विद्यालयात गाडगेबाबांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ,

नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिका संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय आंबेडकर नगर रबाळे मध्ये आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला शालेय परिसर सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी झाडू खराटा घेऊन स्वच्छ केला त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन व विद्यार्थी मनोगत घेण्यात आले माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले महापालिकेचे उप अभियंता भास्कर इसामें यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले माननीय मुख्याध्यापक अमोल खरसांबळे यांनी दीप प्रज्वलन केले यानंतर विद्यार्थी मनोगत मध्ये धनश्री गोडबोले,किरण साळुंखे,चैताली कोळे, रवीकुमार गौतम यांनी गाडगेबाबांचे जीवन चरित्र उलगडले.सुमन तिरकेसे यांनी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे गाडगेबाबांचे भजन गायलं आणि सर्वांचा लक्ष वेधलं मुख्याध्यापक अमोल खरसंबळे यांनीही गाडगेबाबांच्या प्रति संवेदना व्यक्त केली माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी गावातील स्वच्छते बरोबरच लोकांच्या मनातील स्वच्छता करण्याचं काम गाडगेबाबांनी केलं देव हा देवळा मध्ये नाही तर तो माणसांमध्ये आहे मानवाची सेवा करा भुकेलेल्या अन्न द्या तहानलेल्या पाणी द्या अशा प्रकारचा संदेश गाडगेबाबांनी दिला शिक्षणा ,अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता , नीटनेटकेपणा चा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी आपलं उभ आयुष्य घालवलं त्यांना मी वंदन करतो असं सांगितलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रिंकी कुशवाह व विद्यार्थिनी कु संध्याराणी कावरे यांनी अतिशय छान व खुमासदार शैलीमध्ये केले कार्यक्रमाचे संयोजन अस्मिता सन्मुख, सोनी यादव, मीना सुतार, जया नगराळे, वैशाली धनावडे, यांनी केले कार्यक्रमास राजू राठोड अभिमन्यू मोटे ,क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे, राम कंदगुळे, संतोष कारंडे यांच्या सह विद्यार्थी, पालक ,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0
301 views