
८ फेब्रुवारी,२०२५ रोजी शिवसेवा गुरव प्रतिष्ठान व गुरव समाज विकास मंडळ नाशिक जिल्हा यांच्याद्वारे आयोजित "समाज दिन " रोजी गुरव समाजातील सुंदर कार्य करणारी संस्था " समस्त दहिगाव गुरव समाज संस्था जिल्हा नंदुरबार " चा सन्मान
समस्त दाहीगाव गुरव समाज संस्था जिल्हा नंदुरबारद्वारे झालेले यशस्वी उपक्रम
सन १९४७ पासून अखंडित पारंपरिक पद्धतीने सुरू असलेली संस्था आहे.२५ पैसे बचत करून आप आपसात अर्थ साहाय्य करून छोटे रोपटे आज विशाल वृक्षात रूपांतर झालेले आहे.सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शैक्षणिक गुणगौरव घेतला जात आहे.समाजातील एखाद्या घरात दुःखद निधन झाले तर मृत्यू फंड दिला जातो.पारंपरिक लग्न सोहळ्यातील अनिरूद्ध चालीरिती यांना आळा घातला.उदा.दातनचिरी रितीरिवाज,नारळ वाटी सर्व प्रथम दाहीगाव गुरव समाजाने बंद केले.वर घोडामागे कुळडाया,भजी,शेवया न घेऊन जाता फक्त पेढा वराला देणे प्रथा सुरू केली.साखरपुडा झाला तर सायखेडा करु नये असे निर्णय केलेत.साखरपुडयात आलेल्या सुवासिनींना फक्त पाच साड्या देणे.दुःखद निधन झालेल्या समाजबांधव यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी म्हणून दुखवटा टोपी न देता हातात आप आपल्या पध्दतीने आर्थिक रक्कम देणे.वधूवर परिचय घेतला आहे.सन २००२ ला धर्मदाय आयुक्तकडे संस्थेची नोंदणी केली.ऑडिट करून अ वर्ग दर्जा मिळवला.स्वमालकीची जागा सन २०१६ ला घेतली.सन २०१९ ला सदर जागेवर बांधकामाला सुरुवात केली.सन २०२३ आमदार निधीतून समाज भवन बांधले.उर्वरित काम डोम ला लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे.हुंडा पद्धत बंद करून चांगला निर्णय घेण्यात आला.समस्त दाहेगाव गुरव समाजाची मीटिंग प्रत्येक वर्षी कामदा एकादशीला होते.वेळेवर लग्न लावणे हा सुद्धा ठराव एकमताने पास केला.प्री-वेडिंग सुद्धा बंद करण्यात आली.अशाप्रकारे एका छोट्याशा रोपट्यापासून एक मोठे वटवृक्ष बनलेले दाहीगाव गुरव समाजाचे नियमितपणे छोटे मोठे उपक्रम राबवले जात असतात.
अशाप्रकारे केलेल्या सुंदर व यशस्वी उपक्रमामुळे नाशिक येथे झालेल्या " समाज दिन " या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला.