
८ फेब्रुवारी,२०२५ रोजी शिवसेवा गुरव प्रतिष्ठान व गुरव समाज विकास मंडळ नाशिक जिल्हा यांच्याद्वारे आयोजित "समाज दिन " रोजी गुरव समाजातील सुंदर कार्य करणारी संस्था " धुळे जिल्हा गुरव समाज संपर्क विकास मंडळ " चा सन्मान
गुरव समाज संपर्क विकास मंडळ धुळे जिल्हा द्वारे झालेले यशस्वी उपक्रम
सर्वप्रथम गुरव समाज संपर्क विकास मंडळाने धुळे येथे गुरव समाजाचा संपर्क करता यावा म्हणून संपर्क पुस्तिका तयार केली.गुरव समाज संपर्क विकास मंडळ सुरुवातीपासूनच गुरव समाजासाठी एक विशेष प्रोत्साहन म्हणून कार्य करत आहे.सन २०१० मध्ये गुरव समाज उन्नती संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरव समाज संपर्क विकास मंडळाने वधु वर परिचय मेळावा आयोजित केला.सन २०१५ मध्ये गुरव समाज संपर्क विकास मंडळाने पुन्हा वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला.सन २०१७ मध्ये गुरव समाज संपर्क विकास मंडळाने सुंदर व यशस्वी सामुदायिक विवाह सोहळा आयोजन केला.या आयोजनद्वारे समाजात एक वेगळी ओळख या मंडळाची निर्माण झाली.गुरव समाज संपर्क विकास मंडळाच्या या सामुदायिक विवाह सोहळ्याने गुरव समाजात एक विशेष छाप पडली.गुरव समाज संपर्क विकास मंडळाने धुळे येथे गुरव समाजासाठी शवपेटीची व्यवस्था केली याद्वारे समाजात कुठेही दुःखद निधन झाले असेल तर या शवपेटीचा विनामूल्य वापर करता येईल.सन २०२४ मध्ये ८ मार्च रोजी गुरव समाजासाठी एक ऐतिहासिक कार्य गुरव समाज संपर्क विकास मंडळाने करून दाखवले. गुरव समाजाचे आराध्य दैवत श्री संत काशिबा गुरव महाराज आहेत.श्री संत काशिबा गुरु महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पुतळा नव्हता.गुरव समाज संपर्क विकास मंडळाने या गोष्टीची जाणीव घेत श्री संत काशिबा गुरव महाराज यांचा पुतळा असायला पाहिजे हा संकल्प करून धुळे येथील संपूर्ण गुरव समाजाची तीन राज्याची मायबोली संस्था गुरव समाज उन्नती मध्यवर्ती संस्था धुळे च्या भावनावर एक यशस्वी सोहळा आयोजित करून सदर दिवशी श्री संत काशिबा गुरव महाराज यांचा अर्धाकृती पुतळा संपूर्ण आध्यात्मिक विधीसह स्थापित करण्यात आला.अशाप्रकारे गुरव समाज संपर्क विकास मंडळाने गुरव समाजात एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.फक्त हेच नाही तर छोटे-मोठे आरोग्यविषयक शिबिर सुद्धा राबवले.ज्या ठिकाणी गरज भासली असेल त्या ठिकाणी आर्थिक मदत सुद्धा गुरव समाज संपर्क विकास मंडळाने केलेली आहे.
अशाप्रकारे समाजात केलेल्या सुंदर व यशस्वी कार्यामुळे नाशिक येथे "समाज दिन" साजरा झाला त्या दिवशी गुरव समाज संपर्क विकास मंडळाचा विशेष सन्मान करण्यात आला.