
८ फेब्रुवारी,२०२५ रोजी शिवसेवा गुरव प्रतिष्ठान व गुरव समाज विकास मंडळ नाशिक जिल्हा यांच्याद्वारे आयोजित "समाज दिन " रोजी गुरव समाजातील सुंदर कार्य करणाऱ्या संस्थां " गुरव समाज संपर्क विकास मंडळ " व " समस्त दहिगाव गुरव समाज संस्था जिल्हा नंदुरबार " चा सन्मान
गुरव समाज संपर्क विकास मंडळ धुळे जिल्हा
द्वारे झालेले यशस्वी उपक्रम सर्वप्रथम गुरव समाज संपर्क विकास मंडळाने धुळे येथे गुरव समाजाचा संपर्क करता यावा म्हणून संपर्क पुस्तिका तयार केली.गुरव समाज संपर्क विकास मंडळ सुरुवातीपासूनच गुरव समाजासाठी एक विशेष प्रोत्साहन म्हणून कार्य करत आहे.सन २०१० मध्ये गुरव समाज उन्नती संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरव समाज संपर्क विकास मंडळाने वधु वर परिचय मेळावा आयोजित केला.सन २०१५ मध्ये गुरव समाज संपर्क विकास मंडळाने पुन्हा वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला.सन २०१७ मध्ये गुरव समाज संपर्क विकास मंडळाने सुंदर व यशस्वी सामुदायिक विवाह सोहळा आयोजन केला.या आयोजनद्वारे समाजात एक वेगळी ओळख या मंडळाची निर्माण झाली.गुरव समाज संपर्क विकास मंडळाच्या या सामुदायिक विवाह सोहळ्याने गुरव समाजात एक विशेष छाप पडली.गुरव समाज संपर्क विकास मंडळाने धुळे येथे गुरव समाजासाठी शवपेटीची व्यवस्था केली याद्वारे समाजात कुठेही दुःखद निधन झाले असेल तर या शवपेटीचा विनामूल्य वापर करता येईल.सन २०२४ मध्ये ८ मार्च रोजी गुरव समाजासाठी एक ऐतिहासिक कार्य गुरव समाज संपर्क विकास मंडळाने करून दाखवले. गुरव समाजाचे आराध्य दैवत श्री संत काशिबा गुरव महाराज आहेत.श्री संत काशिबा गुरु महाराजांचा संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पुतळा नव्हता.गुरव समाज संपर्क विकास मंडळाने या गोष्टीची जाणीव घेत श्री संत काशिबा गुरव महाराज यांचा पुतळा असायला पाहिजे हा संकल्प करून धुळे येथील संपूर्ण गुरव समाजाची तीन राज्याची मायबोली संस्था गुरव समाज उन्नती मध्यवर्ती संस्था धुळे च्या भावनावर एक यशस्वी सोहळा आयोजित करून सदर दिवशी श्री संत काशिबा गुरव महाराज यांचा अर्धाकृती पुतळा संपूर्ण आध्यात्मिक विधीसह स्थापित करण्यात आला.अशाप्रकारे गुरव समाज संपर्क विकास मंडळाने गुरव समाजात एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.फक्त हेच नाही तर छोटे-मोठे आरोग्यविषयक शिबिर सुद्धा राबवले.ज्या ठिकाणी गरज भासली असेल त्या ठिकाणी आर्थिक मदत सुद्धा गुरव समाज संपर्क विकास मंडळाने केलेली आहे.
अशाप्रकारे समाजात केलेल्या सुंदर व यशस्वी कार्यामुळे नाशिक येथे "समाज दिन" साजरा झाला त्या दिवशी गुरव समाज संपर्क विकास मंडळाचा विशेष सन्मान करण्यात आला.
समस्त दहीगाव गुरव समाज संस्था जिल्हा नंदुरबार
समस्त दाहीगाव गुरव समाज संस्था जिल्हा नंदुरबारद्वारे झालेले यशस्वी उपक्रम
सन १९४७ पासून अखंडित पारंपरिक पद्धतीने सुरू असलेली संस्था आहे.२५ पैसे बचत करून आप आपसात अर्थ साहाय्य करून छोटे रोपटे आज विशाल वृक्षात रूपांतर झालेले आहे.सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शैक्षणिक गुणगौरव घेतला जात आहे.समाजातील एखाद्या घरात दुःखद निधन झाले तर मृत्यू फंड दिला जातो.पारंपरिक लग्न सोहळ्यातील अनिरूद्ध चालीरिती यांना आळा घातला.उदा.दातनचिरी रितीरिवाज,नारळ वाटी सर्व प्रथम दाहीगाव गुरव समाजाने बंद केले.वर घोडामागे कुळडाया,भजी,शेवया न घेऊन जाता फक्त पेढा वराला देणे प्रथा सुरू केली.साखरपुडा झाला तर सायखेडा करु नये असे निर्णय केलेत.साखरपुडयात आलेल्या सुवासिनींना फक्त पाच साड्या देणे.दुःखद निधन झालेल्या समाजबांधव यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी म्हणून दुखवटा टोपी न देता हातात आप आपल्या पध्दतीने आर्थिक रक्कम देणे.वधूवर परिचय घेतला आहे.सन २००२ ला धर्मदाय आयुक्तकडे संस्थेची नोंदणी केली.ऑडिट करून अ वर्ग दर्जा मिळवला.स्वमालकीची जागा सन २०१६ ला घेतली.सन २०१९ ला सदर जागेवर बांधकामाला सुरुवात केली.सन २०२३ आमदार निधीतून समाज भवन बांधले.उर्वरित काम डोम ला लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे.हुंडा पद्धत बंद करून चांगला निर्णय घेण्यात आला.समस्त दाहेगाव गुरव समाजाची मीटिंग प्रत्येक वर्षी कामदा एकादशीला होते.वेळेवर लग्न लावणे हा सुद्धा ठराव एकमताने पास केला.प्री-वेडिंग सुद्धा बंद करण्यात आली.अशाप्रकारे एका छोट्याशा रोपट्यापासून एक मोठे वटवृक्ष बनलेले दाहीगाव गुरव समाजाचे नियमितपणे छोटे मोठे उपक्रम राबवले जात असतात.
अशाप्रकारे केलेल्या सुंदर व यशस्वी उपक्रमामुळे नाशिक येथे झालेल्या " समाज दिन " या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला.