logo

गुरव समाजाचा इतिहासातील एक विशेष दिवस म्हणजे 8 फेब्रुवारी 2025 शनिवार.. शिवसेवा गुरव प्रतिष्ठान व गुरव समाज विकास मंडळ नाशिक जिल्हा यांनी साजरा केला "समाज दिन"

नाशिक येथील गुरव समाजासाठी हा दिवस सोन्याचा दिवस म्हटला जाईल कारण या दिवशी त्यांनी खूप सुंदर आणि छान पद्धतीने " समाज दिवस " म्हणून साजरा केला.

नाशिक जिल्हा शिवसेवा गुरव प्रतिष्ठान व नाशिक जिल्हा गुरव समाज विकास मंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने एक यशस्वी व ऐतिहासिक सोहळा नाशिक येथे आयोजित करण्यात आला.

नाशिक गुरव समाजासह इतर भागातील सुद्धा गुरव समाज विशेष प्रमाणात या सोहळ्यामध्ये उपस्थित होता.सुंदर नियोजन व स्वादिष्ट भोजन सह व्यवस्थाही उत्तम प्रकारची होती.

गुरव समाजातील विविध भागातील उल्लेखनीय कार्य करणारे समाज बंधू-भगिनींचा विशेष सन्मान या सोहळामध्ये करण्यात आला तसेच कौशल्यपूर्ण विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात

सदर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आमदार सीमाताई हिरे तसेच उपस्थित असलेले अनेक मान्यवर व समाज बंधू भगिनी यांनी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात केली.

विशेष प्रवचन

जीवन जगण्यासाठी तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी विशेष प्रवचन ह भ प संजय भोसले महाराज यांच्याद्वारे करण्यात आले.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण त्यांच्या सुंदर वकृत्व होते.

उद्योजक पुरस्कार

गुरव समाजात ज्या समाज सेवकांनी समाजसेवा बरोबर स्वतःचा उद्योगांमध्ये विशेष प्रगती केलेली आहे अशा समाजातील उद्योगपतींचा विशेष सन्मान करण्यात आला.जो उद्योजक समाजाशी जुडलेला असतो व समाजसेवा करतो असा समाजाचा आर्थिक रित्या व रोजगारासाठी विकास हा चांगल्या प्रमाणे होतो

गुणी-जन पुरस्कार

गुरव समाजातील अनेक लोकांनी विविध स्तरावर विशेष कार्य केलेले आहे अशा समाजसेवकांना गुणीजन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला

सेवानिवृत्त सन्मान

गुरव समाजातील शासकीय सेवा करणारे शासकीय कर्मचारी संपूर्ण आयुष्य शासकीय सेवा सुखरूपपणे पार पाडून निवृत्त झालेले आहेत अशा समाजसेवकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.

ज्ञानदान रत्न पुरस्कार

गुरव समाजातील विद्यार्थ्यांसाठी जे कार्य करत आहेत अशा ज्ञानदान करणाऱ्या समाजसेवकांचा सुद्धा ज्ञानदान रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

समाज भूषण पुरस्कार

गुरव समाजासाठी ज्यांनी दिवस-रात्र परिश्रम केलेले आहे असे लोक समाजासाठी सदा तत्पर असतात.अशा परिश्रम करणाऱ्या समाज सेवकांना समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कर्तबगार महिला सन्मान

नाशिक येथील विशेष सोहळा म्हणजे कर्तबगार महिला सन्मान कारण महिला ही घराची फक्त प्रमुख नसून ती घराची प्रमुख करता धरता सुद्धा असते.काही महिलांनी अल्पकाळात आपले सौभाग्य गमावल्याने संघर्षपूर्ण यात्रा केली व या संघर्षपूर्ण यात्रा दरम्यान अनेक कष्ट शोषले,त्या महिलांनी स्वतःचा जीव पणाला लावून स्वतःचा परिवाराची देखरेख करून परिवाराला यशस्वी व प्रगतिशील बनवले अशा नाशिक येथील गुरव समाजातील महान महिला भगिनींचा गौरव पूर्ण सन्मान करण्यात आला.

अध्यात्म रत्न

गुरव समाज विशेष म्हणजे अध्यात्म साठी विशेष जाणला जातो.गुरव समाजात अध्यात्म्याची परंपरा कायम टिकवून ठेवण्यासाठी नियमितपणे अध्यात्मिक कार्य करणाऱ्या तसेच अध्यात्माच्या माध्यमाने फक्त गुरव नाही तर हिंदू धर्माची जागरूकता सदा नियमित ठेवणाऱ्या महान अध्यात्म करणाऱ्या काही समाजसेवकांचा अध्यात्म रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

समाज रत्न

गुरव समाजात अनेक अशी रत्न आहेत की जे समाजासाठी व समाजाचा विकासासाठी सदा धडपड करत असतात,प्रयत्न करत असतात अशा अनेक समाज रत्नांचा समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

आदर्श संस्था पुरस्कार

गुरव समाजात विविध भागात विविध प्रकारच्या संस्था अथवा मंडळे कार्य करत आहेत.प्रत्येक मंडळाचे कार्य करण्याची आगळीवेगळी पद्धत आहे व सर्व मंडळ व्यवस्थितपणे कार्य देखील करत आहेत त्यापैकी बरेचसे मंडळ यांची कार्य उल्लेखनीय असल्याकारणाने अशा संस्था अथवा मंडळांचा देखील त्यांच्या सर्व प्रमुख पदाधिकारी सह विशेष सन्मान करण्यात आला

विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार

गुरव समाजासाठी नाशिक हे शिक्षणाचे माहेरघर असे म्हटले जाते. गुरव समाजातील नाशिक मधील बरेचसे विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये विशेष प्रगती केलेली आहे व त्यांचे कर्तुत्व व कौशल्य सिद्ध केलेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा या सोहळ्यामध्ये कौतुकास्पद पारितोषिक देत सन्मान करण्यात आला

पोलीस निरीक्षक गणेश गुरव

गुरव समाजाचे सर्वात युवा व समाजसेवेसाठी सदा सक्रिय असणारे निफाड येथील पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांचे अनमोल मार्गदर्शन सदर कार्यक्रमांमध्ये लाभले.

गुरव समाजातील विविध दाते

दाता असेल तरच समाज एकत्र येतो व कार्य होते याचे पुन्हा एक मोठे उदाहरण आपणास या सोहळा मध्ये दिसून आले.गुरव समाजातील विविध भागातील आलेले उद्योजक अथवा समाजसेवक यांनी आपापल्या स्तरावर नाशिक जिल्हा शिवसेवा गुरव प्रतिष्ठान साठी विशेष देणग्या जाहीर केल्या.संपूर्ण सोहळा हा शांत व शिस्तप्रिय होता.उपस्थित असलेले सर्व गुरव समाजातील बंधू-भगिनी प्रसन्न व आनंदाने जणू काही सण साजरा करत आहेत असे भासत होते.लहान लहान बाल गोपालांची किलबिल सोहळ्यामध्ये एक विशेष आकर्षण म्हणून भासत होती.

कला गुण कौशल्य

गुरव समाज हा फक्त शिक्षण नाही तर कला गुण कौशल्य मध्ये सुद्धा निपुण आहे याचे पुन्हा एक मोठे उदाहरण आपणास या सोहळ्यामध्ये पहावयास मिळाले.गुरव समाजातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सुंदर संगीत वाद्य केले तसेच मधुर आवाजात सुंदर सुंदर गाणे म्हटले व सोहळ्याला अधिक सुंदर बनवला.

पुस्तक प्रकाशन

नाशिक येथील ज्येष्ठ समाजसेवक श्री पुंडलिक आप्पा बाविस्कर यांच्या धर्मपत्नी सौ रजनीताई पुंडलिक बाविस्कर यांच्याद्वारे रचित सुंदर सुंदर कविता संग्रहाचे पुस्तकाचे प्रकाशन देखील यशस्वीपणे या सोहळ्यामध्ये करण्यात आले.

माऊली लॉन्स नाशिक मधील प्रसिद्ध स्थळावर झालेल्या या कार्यक्रमात आयोजकां द्वारे सुंदर व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली होती.उपस्थित असलेल्या अतिथीं साठी तसेच समाज बंधू भगिनीं साठी नियोजनाप्रमाणे सुंदर बैठक व्यवस्था करण्यात आलेली होती.उपस्थित असलेल्या गुरव समाजातील बंधू-भगिनींना कुठल्याही अडचणी नको याव्या तसेच कुणालाही त्रास नको व्हावा यासाठी विशेष काळजी घेतली जात होती.एकंदरीत पाहिले तर हा एक यशस्वी व ऐतिहासिक उपक्रम होता जो अनेक वर्ष समाज विसरू शकत नाही.या सोहळ्यामध्ये नाशिक येथील गुरव समाजाने जे मेहनत घेतली व परिश्रम केले त्याचे योग्य ते फळ त्यांना नक्कीच मिळेल व येणाऱ्या भावी पिढीसाठी हे एक मोठे उदाहरण बनेल.या उपक्रमापासून एक नवीन प्रकारची उपक्रमाची सुरुवात समाजात होईल यात दुमत नाही.नाशिक जिल्हा शिवसेवा गुरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय जी गुरव विद्यमान अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा गुरव तसेच श्री भरत निकम व त्यांच्या संपूर्ण टीमने खूप सुंदर आयोजन केले.सर्व युवा मित्र मंडळ व महिला मंडळ यांनी योग्य ते सहकार्य केले आणि विशेष म्हणजे नाशिक जिल्हा गुरव समाज विकास मंडळ यांचे देखील अनमोल योगदान या सोहळ्यामध्ये लाभले.एकंदरीत संपूर्ण नाशिक गुरव समाजाचे खूप खूप अभिनंदन अशाच प्रकारचे कार्य आपल्या सर्व नाशिककर यांचा हातून घडत राहो हीच उपस्थित असलेल्या जनसमुदाय कडून अपेक्षा केली जात आहे व सदर कार्यक्रमाचे संपूर्ण गुरव समाज व बाह्य क्षेत्रात देखील कौतुक केले जात आहे.

158
7918 views