
डाॅ.हंसराज वैद्य लिखित"असाध्य ते साध्य" या आत्मकथन ग्रंथाला नागपूरचा "सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार" जाहीर!*
*नांदेड दिनांक ०6/2/2025*
*नांदेड येथील सृजनशील लेखक , प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि निस्पृह सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या "असाध्य ते साध्य" या आत्मकथनपर कादंबरीला 2023- 24 चा "सुधा कुसुम कादंबरी" हा सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.*
*नागपूर येथील इंडिया बुक आॅफ रेकाॅर्डने सन्मानित "पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान" नागपूरच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार, रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी दहा वाजता बाबुराव धनवटे हॉल शिवाजीनगर नागपूर येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत असल्याची माहिती पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानच्या कार्यकारी समिती प्रमुख डॉक्टर स्वाती मोहरीर यांनी कळविले आहे.*
*डॉक्टर हंसराज वैद्य यांचे "असाध्य ते साध्य" या आत्मकथन ग्रंथाचे शीर्षक प्रसिद्ध विचारवंत साहित्यिक, लातूरचे माजी नगराध्यक्ष, स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापिठाचे संस्थापक कुलगुरू तथा मा.खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांनी सुचवले असून विस्तृत असी ग्रंथ सार रूपी आठरा पानी प्रस्तावना दिली आहे!*
.
*नांदेडचे ख्यातकिर्त साहित्यिक मा.देविदास फुलारीसर यांनी या ग्रंथाची सुबक असी पाठ राखन केलेली आहे! नांदेडच्याच संगत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.*
*महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध तथा थोर समीक्षक डॉक्टर श्रीपाद सबनीस सर,मराठ वाड्याचे ऋषितुल्य समिक्षक मा.भु.द.वाडीकरसर, नांदेड येथील साहित्यिकांचे आधारवड देविदास फुलारी सर आणि मा. शिक्षणमंत्री कमल किशोरजी कदम, मा.गृह राज्यमंत्री माधवरावजी पाटील किन्हाळकर,मा.खा.प्रतापजी पाटील चिखलीकर, मा.खा.हेमंत पाटील मा.जिल्हाधिकारी, मा.म.न.पा.आयुक्त यांच्या साक्षिने व शहरातील मा.डाॅक्टर्स, इंजिनियर्स, वकील, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक व साहित्य प्रेमी अदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेडकरांच्या कायम स्मर्णात राहिल असा नियोजन भवन येथे या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा दि.22/3/2023 पाडव्याच्या सुमुहूर्तावर थाटात संपन्न झाला.*
*तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा या लहानशा खेड्यातील एक कष्टकऱ्याचा गरिबी मुळे चार वर्षा शिक्षण खंडित झालेला हंसराज नावाचा मुलगा पुढे केवळ अभ्यासाच्या आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर प्रख्यात बालरोग तज्ञ होतो व प्रसिद्ध कवि- लेखकही होतो आणि देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती भवनापर्यंत पहोचतो याचे प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीमध्ये आहे.*
*त्यांची विशेष ग्रंथ संपदा पक्ष्यांची शाळा (बाल गीते संग्रह),जीवन धारा(प्रौढ कविता संग्रह),राजाई(केवळ आई वरील कविता संग्रह) राहिली आहे.राजाई मुळे ते "राजाईकारा" म्हणून प्रसिद्धी पावले!*
*नुकताच त्याना राष्ट्रसंत सद् गुरू डाॅ.शिवलिंग शिवाचार्य सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने "श्री गुरूदेव जीवन गौरव पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले आहे.*
*डॉक्टर हंसराज वैद्य यांना मिळालेल्या या पुरस्कारांबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे!*