logo

शेजाऱ्याने भांडणातून 9 महिन्याच्या बाळावर केले कुऱ्हाडीने वार; तळपायाची आग मस्तकात नेणारी घटना......

बेलापूरमध्ये एका 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळावर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. 9 महिन्यांचा चिमुकला गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 
बेलापूरमधील पंचशील नगर झोपडपट्टीत शेजाऱ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात भयंकर घटना घडली आहे. या भांडणातून शेजाऱ्याने 9 महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केला. 9 महिन्याच्या बाळाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन आरोपी झाला फरार झाला आहे. एनआरआय पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कसून शोध घेत आहेत. 9 महिन्यांचा चिमुकला गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

209
7698 views