logo

रेल्वेप्रवासासाठी घाईगडबडीत चुकीच्या तारखेचं तिकीट काढलं? ते कॅन्सल करण्याऐवजी हे करा.....

ndian Railways : सवयीचा भाग नसेल, तर एखादं काम करताना उडणारा गोंधळ अतिशय स्वाभाविक आहे. रेल्वेचं तिकीट काढताना पहिल्यांदाच हे काम करणाऱ्यांच्या ही बाब पहिल्या काही मिनिटांतच लक्षात येते आणि यात गैर काहीच नाही. नकळतच माहिती आणि तारखांचे इतकी रकाने भरताना एखादा आकडा चुकतो आणि जमू आभाळ कोसळलं अशीच भावना अनेकांच्या मनात घर करते. आता मात्र रेल्वेचं तिकीट काढताना एखादी चूक झालीच, तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 

Indian Railways प्रवाशांच्या मदतीसाठी हजर 

प्रवाशांच्याच हितासाठी आणि प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत विविध सुविधा पुरवणाऱ्या भारतीय रेल्वेकडून काही अशाही सुविधा पुरवण्यात येतात ज्याची प्रवाशांना मोठी मदत होते. त्यामुळं रेल्वेचं तिकीट एखाद्या चुकीच्या तारखेसाठी आरक्षित केलं तर त्यात बदल करता येणार आहेत. हे तिकीट प्रवासी त्यांच्या कोणत्याही नातेवाईकाच्या नावावर फिरवू शकतात, पण इथंही काही नियमांचं पालन केलं जाणं अपेक्षित आहे. रेल्वेच्या अटीशर्थींनुसार प्रवासी समुहानं प्रवास करत असल्यास तिकीट दुसऱ्या प्रवाशाच्या नावे करण्याची मुभा इथं दिली जाते. 

कोणकोणत्या तिकीटांमध्ये करता येतो बदल? 

ऑफलाइन बुकिंग: जर लांब पल्ल्याच्या प्रवासाचं तिकीट रेल्वेच्याच तिकीट आरक्षण खिडकीवरून आरक्षित केलं असेल तर त्यामध्ये तुम्ही तारीख किंवा नाव बदलू शकता. 
ऑनलाइन बुकिंग: जर एखाद्या प्रवाशानं IRCTC चं संकेतस्थळ किंवा अॅपच्या माध्यमातून तिकीच बुक केलं असेल तर मात्र इथं बदल करता येणं शक्य नाही. 

तिकीटावरील नाव किंवा तारीख बदलण्यासाठी काय करावं? 

तिकीटावर वरील नाव बदलण्यासाठी प्रवासाच्या 24 तासांपूर्वी स्थानकावर जावं, तर तारीख बदलण्यासाठी 48 तासांपूर्वी रेल्वेस्थानकावर जाऊन मूळ तिकीटाची प्रत आणि एक अर्ज सोबत न्यावा. इथं तिकीटामध्ये बदल करण्यासाठी रेल्वे विभागाकडून किमान शुल्क आकारलं जातं. 
महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही ज्या तारीख आणि नावानं तिकीटामध्ये बदल करत आहात त्या तारखेला अमुक एका रेल्वेमध्ये आसनक्षमता असणंही तितकंच महत्त्वाचं. 

108
8232 views