देगलूर विधानसभेसाठी. ५१. ३६ टक्के मतदान.
देगलूर (प्रतिनिधी) नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व देगलूर विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदारसंघातील ७८ हजार १४६ पुरुष मतदार ८२ हजार २३१ महिला मतदार आणि तृतीयपंथी - ०३ मतदार अशा एकूण ०१ लाख ६० हजार ३८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून त्याची टक्केवारी ५१.३६ एवढे टक्के झाले आहे. देगलूर बिलोली तालुक्यातील ३५१ मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याची माहिती देगलूर विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती क्रांती डोंबे यांनी दिली आहे.
देगलूर बिलोली तालुक्यात ३५१ मतदान केंद्र होते. या मतदारसंघात ०१ लाख ५९ हजार ३१७ पुरुष मतदार, ०१ लाख ५२ हजार ७०३ स्त्री मतदार तर १७ तृतीयपंथी मतदार असे एकूण ०३ लाख १२ हजार २३७ मतदार आहेत त्यापैकी ०१ लाख ६० हजार ३८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा देगलूर चे तहसीलदार भरत सूर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा बिलोली चे तहसीलदार गजानन शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश पुदाके, नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड, आचारसंहिता पथक प्रमुख तथा गटविकास अधिकारी शेखर देशमुख, श्रीनिवास पदमवार, नायब तहसीलदार आर जी चव्हाण, गिरीश सर्कलवाड, दीपक मराळे, वैशाली गंदीगुडे, सुषमा मोहोळ, देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, देगलूरचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे, बिलोलीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, नरहरी फड, रवी हुंडेकर, भगवान नागरगोजे,सुनील पत्रे आदींनी मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
---------------------
वयोवृद्ध ,दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सुविधा ....
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक ,देगलूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी मधे दिव्यांग तसेच ८५ वर्षाचे व वयोवृद्धासाठी
प्रत्येक मतदान केंद्रावर
व्हिल चेअरची व्यवस्था ठेवण्यात आली होती.देगलूर बिलोली विधान सभा क्षेत्रात ८३ गावातील ८५ वर्षावरील आणि दिव्यांग असे १५४ मतदार आहेत .
दि. २० नोव्हेंबर बुधवार रोजी झालेल्या मतदानात भक्तापूर,वन्नाळी,कारेगाव,क्षिरसमूद्र यासह अनेक मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच वयोवृद्धांना व्हीलचेअर ची सुविधा पुरविण्यात आल्याने मतदान करणे शक्य झाले मतदान करण्यास अशा व्यक्तीमधे उत्साह दिसून येत होता.