logo

देशातील कोट्यवधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून जनरल कोच संदर्भात मोठा निर्णय.....

देशातील कोट्यवधी लोक रोज रेल्वेच्या सेवेचा वापर करतात. दूरच्या अंतरासाठी कमी खर्चात सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यात फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी कोच, जनरल कोच अशा कोचमधून तुम्हाला प्रवास करता येतो. दररोज एक लाखाहून अधिक प्रवाशांना प्रवासाची सुविधा देण्यासाठी रेल्वे बोर्डाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे. काय आहे हा निर्णय? सर्वसामान्य प्रवाशांना याचा कसा फायदा होणार? सविस्तर जाणून घेऊया.
रेल्वेकडून 370 ट्रेनमध्ये 1000 नवीन जनरल डबे जोडले जात आहेत.  नोव्हेंबरच्या अखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बोर्डाने मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. अनेक गाड्यांमध्ये 583 जनरल डबे आधीच बसविण्यात आले आहेत. उर्वरित बोगी जोडण्याची प्रक्रिया देशभरातील सर्व रेल्वे झोन आणि विभागांमध्ये सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस ती पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 
'पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये येणाऱ्या होळीच्या दिवसापासून आम्ही सज्ज आहोत. सणासुदीच्यादिवशी रेल्वे प्रवाशांची संख्या अनेक पटीने वाढते. अशावेळी गर्दीला तोंड देण्यासाठी आम्ही नियोजन केले असून त्यानुसार तयारी सुरू केली असल्याचे', ते पुढे म्हणाले.

रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 2 वर्षांत 10 हजार नॉन-एसी डबे जोडण्याची आमची योजना आहे. त्यानंतर 8 लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करू शकतील, असे रेल्वेने सांगितले. हे सर्व 10 हजार डबे एलएचबी श्रेणीचे आहेत. ज्यामध्ये अॅडव्हान्स सुरक्षा आणि प्रवाशांना सुविधा देण्यात आली आहे. 

153
8181 views