logo

शाळेत उशिरा आल्यामुळे दोन विद्यार्थिनींचे केस कापले, शाळेवर झाली कारवाई.......

एका सरकारी शाळेत मुख्याध्यापकांनीच दोन मुलींचे केस कापल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याला कारण असं की, मुली शाळेत उशिराने आल्यामुळे मुख्याध्यापकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपी मुख्याध्यापरांना निलंबित केलं असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 
ही घटना अल्लूरी सीतारामराजू जिल्ह्यातील मदुगुलामधील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात घडली आहे. हा प्रकार समोवारी उघडकीस आला असून यानंतर मुख्याध्यापक आरोपी यू साई प्रसन्ना यांच्या विरोधात कारवाई केली आहे. 
सोमवारी झालेल्या प्राथमिक चौकशीनंतर मुख्याध्यापकांवर लावलेले आरोप योग्य असल्याच समोर आलं आहे. ज्यानंतर रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी आणि बाल विकास अधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. 
अशाच पद्धतीची घटना बिहारमधीय अरवल जिल्ह्यात घडली होती. शाळेचा गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला अतिशय अमानुषपणे मारहाण केली. 12 वर्षीय विद्यार्थ्याला या प्रकरणात गंभीर दुखापत झाली. ज्यानंतर त्याला पटनाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अजूनही त्या विद्यार्थ्यावर उपचार सुरु आहेत. 
विद्यार्थ्यांना अशा अमानुष पद्धतीने होत असलेल्या मारहाणीवर शाळेत एक फोरम तयार करण्यात आले आहेत. या फोरम अंतर्गत विद्यार्थी आणि पालक शिक्षकांविरोधात तक्रार करु शकतात.

शाळांमध्ये तक्रार पेटी 

सर्व मुलांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीद्वारे सांगितले जाईल की त्यांना शारीरिक शिक्षेविरुद्ध त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक शाळा, जिथे वसतिगृह, जेजे होम, बाल संरक्षण गृह इत्यादी एक मंच तयार केला जाईल. जिथे मुले त्यांचे विचार मांडू शकतात.
प्रत्येक शाळेत तक्रार पेटी असेल, जिथे विद्यार्थी त्यांचे तक्रार पत्र देऊ शकतील. पालक शिक्षक समिती या तक्रारींवर नियमितपणे सुनावणी घेईल. नवीन शैक्षणिक धोरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी रविवारी बैठक घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या.

शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल

मूलभूत शिक्षण महासंचालकांनी सर्व जिल्ह्यांच्या मूलभूत शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांमध्ये कोणत्याही मुलाशी भेदभाव केला जाणार नाही, असे म्हटले आहे. तसेच प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना त्यांच्या अधिकाऱ्यांची जाणीव करून दिली जाणार आहे. मुलांसाठी तयार केलेले मॉड्यूल. त्याचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले पाहिजे.

142
6469 views