logo

शिवसेना शिंदे गटाचे नंदूरबार जिल्हा अध्यक्ष किरसिंग दादा वसावे यांचे रोख ठोक बोल

अक्कलकुवा प्रतिनिधी : (गंगाराम वसावे)
आज दि.(6) रोजी शिवसेना शिंदे गटाचे नंदूरबार जिल्हा अध्यक्ष मा. किरसिंग वसावे
यांच्या अक्कलकुवा येथील संपर्क कार्यालयात भेट घेतली असता अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या ‌वतीने उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली.तसेच पक्षाच्या नेत्यां कडून उमेदवारी अर्ज ढवळला गेला म्हणून त्यांनी खंत व्यक्त केले.आपण आपल्या पक्षाने देलेली जबादारी एकनिष्ठतेने व विश्वास योग्यतेने पारपाडलेली आहे व माननीय मुख्य मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या वेगवेगळ्या योजना विषयी ही त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ ‌शिदे साहेबांचे कौतुक केले.व आपण आपला विधान सभा उमेदवारी अर्ज दाखल केला असून तो नाकारला गेला व निवडणूक अधिकारी द्वारे माझ्या बरोबर कुठेतरी अन्याय झाला आहे असे मला वाटते असे त्यांनी सांगितले आपण जर न्यायालयाचे दार ठोठावले असते तर मला न्याय नक्की मिळाला असता असे देखील म्हटले परंतु मि आपल्या पक्षाबरोबर एक निष्ठ आहे माझे वरीष्ठ अधिकारी जे आदेश देतील त्याचा मी पालन करेल व पक्षा बरोबर बंडखोरी करणार नाही असे ही त्यांनी सांगीतले परंतु कुठेतरी जनतेला परिवर्तन हवे होते ते होणार नाही व जनतेला नव्या उमेदवाराची अपेक्षा होती ते जनतेला मिळाले नाही म्हणून कार्यकर्त्या मध्ये व जनते मध्ये नाराजी आहे असे वक्तव्य त्यांनी केले.

16
2554 views