
श्रीरामपूरच्या उमेदवारी बाबद दोन दिवसात निर्णय
प्रतिनिधी :- प्रतिनिधी
दि २४
श्रीरामपूर / अहमदनगर
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी बाबद मतदारसंघातील समविचारी पक्ष व संघटनासोबत चर्चा करून प्रहार चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ना.
बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल असे प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अप्पासाहेब ढूस यांनी सांगितले..
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ना.
बच्चुभाऊ कडू साहेब यांचे आदेशानुसार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ठरविणे बाबत प्रहारचे मतदार संघ प्रमुख आप्पासाहेब ढूस यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दि.२३ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ठीक ०४.०० वाजता श्रीरामपूर येथील प्रहार च्या कार्यालयात मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव खडके, कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे, तालुका उपाध्यक्ष दीपक पटारे, तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब तागड, कार्यकारणी सदस्य रनजीत शिनारे, तालुका संघटक राजेंद्र चौधरी, श्रीरामपूर शहर प्रमुख सोमनाथ गर्जे, संघटक प्रभाकर कांबळे, युसूफ पठाण, सुमित राहिले आदी पदाधिकाऱ्यांसह प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
पार पडलेल्या बैठकीत समविचारी पक्ष व संघटना यांना सोबत घेऊन दोन दिवसात इच्छुक उमेदवारांची नावे आप्पासाहेब ढूस यांचे मार्फत प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ कडू यांना कळविण्यात येतील. तदनंतर बच्चुभाऊ कडू यांच्या मान्यतेने अंतिम उमेदवार ढूस जाहिर करतील असे सर्वानुमते ठरले.