logo

शाहू महाराज विद्यालयाला कबड्डी मध्ये तिहेरी मुकुट ,

नवी मुंबई - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे व नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तर शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच डॉ सामंत विद्यालय तुर्भे या ठिकाणी पार पडल्या यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय आंबेडकर नगर रबाळे नवी मुंबई च्या विद्यार्थ्यांनी तीन गटांमध्ये आपला दबदबा प्रस्थापित केला 14 वर्षाखालील मुली या गटात प्रथम क्रमांक, 17 वर्षाखालील मुले व मुली या दोन्ही गटांमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. नवी मुंबईतील 14 वर्षे वयोगटांमध्ये जवळपास 60 संघ सहभागी झाले होते व 17 वर्षे वयोगटात 80 पेक्षा जास्त संघ सहभागी झाले होते यामधून आपल्या खेळाचे कौशल्य दाखवून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये घवघवीत नेत्रदीपक असे यश संपादन केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मनोज चव्हाण सर, क्रीडा शिक्षक अमोलकुमार वाघमारे व त्यांचे सर्व सहकारी यांचे विशेष अभिनंदन या सर्व विद्यार्थी यांचे माजी महापौर सुधाकर सोनवणे, क्रीडा विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे,क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक माध्यमिक अमोल खरसंबळे, मुख्याध्यापिका प्राथमिक सौ. रंजना वनशा केंद्र समन्वयक रमेश तेली व अविनाश जाधव व सर्व पालक वर्गातून अभिनंदन होत आहे 14 वर्षाखालील मुलींचा संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे विभागीय स्पर्धा सात तारखेला सफाळे पालघर या ठिकाणी होणार आहेत त्यासाठी संघ आणखीन कसून सराव करत आहे.

0
1551 views