सेवेमध्ये निष्काम भावना गरजेची
- सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज
सेवेमध्ये निष्काम भावना गरजेची
- सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज
दिल्ली, सप्टेंबर 25, 2024:- 24 सप्टेंबर रोजी हरिजन सेवक संघाच्या 92व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित सद्भावना संमेलनामध्ये आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, “मानव खऱ्या अर्थाने तेव्हाच मानव बनतो जेव्हा तो समस्त भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्वांभूती परमात्म्याचे रूप पाहू लागतो आणि निष्काम भावनेने सर्वांची सेवा करतो.”
या प्रसंगी हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष डॉक्टर शंकर कुमार सान्याल व उप-प्रधान श्री.नरेश यादव यांनी सतगुरु माताजी व निरंकारी राजपिता रमितजी यांचा वस्त्र-प्रावरण व सूती दुपट्टयाद्वारे स्वागत-सत्कार केला. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक वारसा रूपी संस्थेच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून चरख्याचे लघु स्मृति चिन्ह देखील या सेवक संघाच्या वतीने सद्गुरु माताजींना समर्पित करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये हरिजन सेवक संघाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व सरस्वती वंदनाचे गायन केले तर निरंकारी इंस्टिट्यूट ऑफ म्यूजिक ॲन्ड आर्ट (नीमा) च्या मुलांनी गांधीजींचे आवडते भजन, “वैष्णव जन” सह अन्य भक्तिगीतांचे सुमधुर गायनही केले. सेवक संघाचे अध्यक्ष श्री.सान्याल यांनी गांधीजी आणि कस्तूरबाजी यांच्या मार्गदर्शनाचे वर्णन करताना एका बाजुला संघाच्या उपक्रमांचा उल्लेख केला तर दुसऱ्या बाजुला संत निरंकारी मिशनच्या विचारधारेचे अनुपालन केल्याने “वसुधैव कुटुम्बकम” साकारण्याची शक्यता वर्तवून सद्गुरु माताजींना धन्यवाद दिले. त्यांनी निरंकारी मिशनकडून सामाजिक उत्थान घडवून आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या अवरित प्रयासांची मन:पूर्वक प्रशंसा केली.
यावेळी निरंकारी राजपिताजी यांनीही आपल्या आशीर्वचनातून सांगितले, की सतगुरुकडून परमात्म्याची प्राप्ती केल्यानंतर मनुष्य सर्वांचे दु:ख-वेदना स्वत:चे समजून अहंकाररहित सेवा करु लागतो.
कार्यक्रमाच्या शेवटी संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनचे सचिव, श्री.जोगिंदर सुखिजा यांनी आभार प्रकट करताना हरिजन सेवक संघाच्या भारतभरातून सहभागी झालेलया सदस्यांना व विशिष्ट अतिथिंना धन्यवाद दिले तसेच त्यांना येत्या नोव्हेंबरमध्ये करण्यात येत असलेल्या 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे हार्दिक आमंत्रणही दिले.