logo

महा अंनिसची पुरूषभान संवादसत्र संपन्न ,

नवी मुंबई - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवी मुंबई शाखेतर्फे *पुरूषभान संवादसत्र* घेण्यात आले. स्त्री सन्मानासाठी पुरूषभान संवाद यात्रा अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संवादसत्र मंगळवार दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ रोजी सीबीडी बेलापूर येथील 'भारती विद्यापीठ, फार्मसी काॅलेज' येथे पार पडले.
देशभरात घडत असलेल्या स्त्रियांवरील बलात्कार, लैंगिक अत्याचार व हिंसेच्या घटनांमुळे आपण सर्वच अस्वस्थ आहोत. या घटनानंतर जनसमूह रागाने उसळतो, मोर्चा, आंदोलने होतात पण पुन्हा या घटना सातत्याने घडत राहतात. बहुतांश वेळा मुलींना यापासून दूर राहण्याचे मार्गदर्शन, सल्ले दिले जातात. मात्र यावर दीर्घकालीन उपाय म्हणजे 'पुरूषी वर्चस्ववादी मानसिकता' बदलून प्रत्येक पुरूषात, पुरूषभान जागृत करणे हा आहे. महीलांना देखील या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
या संवादसत्रात *मा. तेजल खेडेकर व तुषार शिंदे* यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी पीपीटी द्वारे संवाद साधला. पुरूषभान विवेकी करण्यासाठी, स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कार विचारातून व कृतीतून केला पाहिजे. आकर्षण व प्रेम यातील फरक समजावून सांगितला. आकर्षण हे चटकन होणारे, थोड्या काळासाठी व बाह्य जगाचा विसर पडून निर्माण झालेले असते. तर प्रेम निरंतर सहवासातून वास्तव परिस्थितीचे भान येऊन होते. आपण आपल्या मताशी प्रामाणीक राहून इतरांच्या मताचा सुध्दा आदर केला पाहिजे. आपली मत दुसर्याने न स्विकारल्यास, हिंसा करणं सर्वस्वी अमान्य आहे. पुरूषभान जागृत करून विवेकी समाज घडवण्याचा संदेश देण्यात आला.
संवादसत्रात भारती विद्यापीठ, फार्मसी काॅलेजचे *प्राचार्य मा. डाॅ. विलासराव कदम* व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

संवाद सत्रात सहभागी महा. अंनिसचे कार्यकर्ते जिल्हा प्रधान सचिव प्रा. अमोलकुमार वाघमारे, गजानंद जाधव, उत्तम रोकडे, अरूण जाधव, ए. एच्. शाह , कार्याध्यक्षअशोक निकम, ज्योती क्षीरसागर हे उपस्थित होते

14
2231 views