logo

राष्ट्रीय महामार्ग लगत हायमस्ट्ट लॅम्प चालू करण्याची मागणी श्री कपिल देव चौधरी यांनी केले*

*राष्ट्रीय महामार्ग लगत हायमस्ट्ट लॅम्प चालू करण्याची मागणी श्री कपिल देव चौधरी यांनी केले* दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी अक्कलकुवा तहसील कार्यालय येथे गणेश उत्सवानिमित्त शांतता कमिटीची बैठकीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा महामंत्री भाजपा नंदुरबार चेअरमन खादी व ग्रामोद्योग मंडळ अक्कलकुवा तालुका श्री कपिल देव चौधरी यांनी आठ ते दहा वर्षापासून बंद पडलेले अक्कलकुवा गावा लगत राष्ट्रीय महामार्गाचे हायमाष्ट्ट लॅम्प त्वरित चालू करण्याची मागणी केली. सलग चार ते पाच वर्षापासून शांतता कमिटीची बैठकीमध्ये व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुद्धा लॅम्प सुरू झाले नाही परंतु या वेळेस तरी सुरू करण्यात यावे जेणेकरून होणारे अपघात दुर्घटना टळतील व आगामी सण उत्सव गणेश उत्सव नवरात्र उत्सव येणारे सण त्योहराच्या दृष्टिकोनातून हे लॅम्प चालू करणे अत्यावश्यक आहे मागच्या वर्षी मानवता धर्म नात्याने स्थानिक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने डिव्हायडर वरती उजेडा साठी सिग्नल लाईट व रेडियम प्लेटा लावले होते व त्या अनुषंगाने काही प्रमाणात अपघात ही टळले होते , . बैठकीच्या वेळेस अक्कलकुवा तालुक्याचे तहसीलदार श्री भुमरे साहेब अक्कलकुवा शहराचे पोलीस निरीक्षक श्री गुलाबराव पाटील साहेब अक्कलकुवा तालुक्याचे नायब तहसीलदार श्री गांगुर्डे साहेब व सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिक शांतता कमिटीचे सदस्य गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी आधी उपस्थित होते.

155
10489 views